अमरावती, 29 नोव्हेंबर : सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने लग्नकार्यात (Wedding) होणाऱ्या खर्चाच्या बचतीतून गावातील समाज मंदिरामध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी संगणक केंद्र (computer lab) सुरू करून नव दाम्पत्याने आदर्श घडवून दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील शेंदोळा खुर्द येथील निलेश व जया या नव वर-वधूनी लग्नाच्या दिवशी विद्यार्थ्यांना 7 संगणक दान केले आहे.
कोरोना काळात अनेकांनी आपले मोठे लग्न सोहळे हे अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत उरकते घेतले. जास्त गाजावाजा व लोकांच्या गर्दीला मर्यादा ठेवून शासन विवाह सोहळ्याला परवानगी देत आहे. त्यामुळे अनेकजण आपल्या मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळा पार पाडत आहे.
स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही या गावात पूल नाही; ग्रामस्थ अशी पार करतात नदी
मात्र, तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द येथील निलेश सूर्यप्रकाश जवंजाळ व जया या नव दाम्पत्याने आदर्श विवाह करत गावातील विद्यार्थ्यांकरीता संगणक केंद्र दान केले आहे. तर त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे बाबा, गौतम बुद्ध, तुकडोजी महाराज यांच्यासह थोर महापुरुष यांच्या विचारांचे फलक पाहायला मिळाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे 'पे बॅक टू सोसायटी' या विचाराला खऱ्या अर्थाने आचरणात आणू आपल्या कमाईचा विसावा हिस्सा हा समाजासाठी दान करणे हे आपले कर्तव्य आहे, याच उद्देशाने निलेश व जया यांनी आपल्या मंगल परिणय दिनी गावातीलच समाज मंदिराची रंगरंगोटी करून याठिकाणी विद्यार्थ्यांकरीता सात संगणक दान केली आहे.
मृत्यूच्या 4 वर्षांनंतर PM आवासमधून मिळालं घर; बँकेतून हप्त्याची रक्कमही गेली
सामाजिक कृतज्ञता संगणकीय ज्ञान विद्यार्थ्यांना गावा पातळीवर निशुल्क मिळावे हा उद्देशसमोर ठेवून गाव विकासाकरिता कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे, त्यांच्या दान कार्याचे गावात मोठे कौतुक होत आहे.
या आदर्श लग्न सोहळ्याला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, सिनेट सदस्य रवींद्र मुद्रे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून नव वर-वधूना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.