IDBI बँकेच्या ATMवर दरोडा, तिजोरीत होती 28 लाखांची रक्कम

IDBI बँकेच्या ATMवर दरोडा, तिजोरीत होती 28 लाखांची रक्कम

या ATM जवळ सुरक्षा रक्षक का नव्हता याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व बँकांनी एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

  • Share this:

विजय कमळे पाटील, जालना 31 जुलै : मराठवाड्यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या जालन्यात IDBI बँकेचा ATM फोडण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडालीय. शहरातील मामा चौकाजवळ असलेल्या IDBI बँकेच्या ATMवर मध्यरात्री दरोडा पडला. पण चोरट्यांना यात यश आलं नाही. यावेळी ATMच्या तिजोरीत तब्बल 28 लाखांची रोकड होती. चोरांना ATM फोडता न आल्यानं हा प्रयत्न फसला. त्यामुळे तिजोरीतली 28 लाखाची रोकड सुरक्षित राहिलीय.

होय, खेकडे धरण फोडू शकतात - आदित्य ठाकरे

मामा चौक हा जालन्यातला महत्त्वाचा चौक आहे. त्यामुळे या चौकात बँका आणि ATMची संख्याही जास्त आहे. पावसाळी वातावरणाचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्री ATM फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षक तिथे नव्हता. मात्र पैसे असलेली तिजोरी सुरक्षित ठेवलेली असल्याने सुरक्षा कवच भेदून चोरट्यांना ती फोडता आली नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. त्यांनी बरीच खटपट करून पाहिली मात्र त्यांना यश आलं नाही.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या इमारतीचा स्लॅब कोसळला, खातेदारांसह 30 जण अडकल्याची भीती

आपला प्रयत्न फसला असं त्यांच्या लक्षात येताच सर्व चोरट्यांनी तिथून पोबारा केला. पहाटे पहाटे जेव्हा ही गोष्ट लक्षात आली तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी फिंगरप्रिंट एक्सपर्टसना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. दरम्यान, काही बोटांचे ठसे मिळाले असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असली तरी चेहरा अस्पष्ट दिसत असल्याने चोरांचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे.

या ATM जवळ सुरक्षा रक्षक का नव्हता याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व बँकांनी एटीएमच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत. रात्री सुरक्षा रक्षक राहील याची काळजी घ्यावी असंही पोलिसांनी बँकांना सांगितलंय.

First published: July 31, 2019, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading