Ichalkaranji: सेनेच्या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची गर्दी, तर भाजपच्या कार्यक्रमाला शिवसेना खासदारांची एंट्री

Ichalkaranji: सेनेच्या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची गर्दी, तर भाजपच्या कार्यक्रमाला शिवसेना खासदारांची एंट्री

राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. दोन कार्यक्रमांची मोठी चर्चा आहे.

  • Share this:

इचलकरंजी/कल्याण, 27 जानेवारी: इचलकरंजी, 27 जानेवारी : शिवसेनेच्या (Shiv sena) खासदाराच्या कार्यक्रमाला भाजप (Bharatiya Janata Party) कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचं चित्र इचलकरंजीत (Ichalkaranji) दिसलं, तर दुसरीकडे कल्याणमध्ये (Kalyan) भाजप नेत्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अचानक एण्ट्री करत शिवसेनेच्या दुसऱ्या एका खासदाराने आश्चर्याचा धक्का दिला.

ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजून थंड झाले तरी राजकारणाची हवा तापलेली आहे आणि आता महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांनी लक्ष वेधलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगलेचे शिवसेना (Shiv Sena) खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel  Mane) यांच्या इचलकरंजीतील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन 26 जानेवारीला करण्यात आलं. सेनेच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्याबरोबर अनेक भाजपचे कार्यकर्ते धैर्यशील मानेंच्या इचलकरंजीतल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला हजर होते. याशिवाय माजी खासदार निवेदिता मानेही या कार्यक्रमाला आल्या होत्या.

महापालिकेचं राजकारण

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर स्थानिक राजकारणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ही निवडणूक शिवसेने, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी स्वबळावर लढवायची की महाविकास आघाडी म्हणून एकत्रित यावरून पक्षांतर्गत मतभेद असल्याचं समजतं.

काँग्रेसचे सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्वबळावर निवडणूक लढवायची एकतर्फी घोषणा कोणी केली यावरून आरोप प्रत्यारोपही झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी संपर्क वाढवायचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा इचलकरंजीच्या कार्यक्रमानंतर सुरू झाली.

कल्याणमध्ये भाजपच्या कार्यक्रमात सेना खासदार

दुसरीकडे कल्याणमध्ये बरोबर उलटं चित्रं दिसलं. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपा नेत्यांनी कल्याण येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अचानक हजेरी लावत सर्वांनाचआश्चर्याचा धक्का दिला. तसंच या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी केलेलं एक वक्तवही चर्चेचा विषय ठरत आहे. आणि यावरून आता  राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

हे देखील वाचा - भाजप नेत्यांच्या कार्यक्रमात अचानक शिवसेना खासदाराची एण्ट्री, शहरात युतीच्या शक्यतेची चर्चा

'आता सोशल डिस्टन्स असला तरी आपल्या एकमेकांमधील डिस्टन्स वाढलं नाही पाहिजे असे,' असे वक्तव्य खासदार शिंदे यांनी भाजपच्या कार्यक्रमात केले असल्याने आता एकच चर्चा रंगू लागली आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये हे युतीचे संकेत तर नाही ना? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित झाला आहे.

पत्रीपुलाजवळील पोहोच रस्त्याला जोडणाऱ्या चौकाचे आज नामकरण करण्यात आले. सदर कार्यक्रम भाजप नगरसेविका रेखा चौधरी यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाला डोंबिवली भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कार्यक्रम ठिकाणाच्या परिसरातूनच खासदार शिंदे हे जात होते. या कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपली गाडी थांबवित कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली. भाजपच्या या कार्यक्रमामध्ये खरे तर खासदार शिंदे यांना निमंत्रण नव्हते, मात्र तरीही तेथून न थांबता निघून जाणं त्यांना योग्य वाटले नसल्याचं सांगत ते या कार्यक्रमात सहभागी झाले.

Published by: Aditya Thube
First published: January 27, 2021, 1:51 PM IST

ताज्या बातम्या