• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवील पण कुणाकडे पद मागणार नाही' पंकजा मुंडेंची गर्जना

'गरीब माणसाच्या पायावर डोकं ठेवील पण कुणाकडे पद मागणार नाही' पंकजा मुंडेंची गर्जना

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं वक्तव्य करत एका प्रकार पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा उघड केली

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं वक्तव्य करत एका प्रकार पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा उघड केली

पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं वक्तव्य करत एका प्रकार पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा उघड केली

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 20 नोव्हेंबर : 'एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही' असं म्हणत भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी पुन्हा एकदा पदाबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. बुलडाणा (buldhana) जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांची खदखद समोर आल्याचं पाहायला मिळाली. 'माझं विश्व, माझे माता पिता, माझे कुटुंब तुम्ही सर्वजण आहात. तुम्हाला मी दहा परिक्रमा करेल, पण अजून कुठल्याही परिक्रमेची मला आवश्कता वाटत नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईल, पण कुणासमोर हात पसरवून कुठल्या पदाची मागणी करण्याची माझी संस्कृती नाही' असं पंकजा मुंडे म्हणाल्या. Latent View Analytics IPO : GMP आधारावर इश्यूच्या दमदार एन्ट्रीचे संकेत तसंच, एखाद्यावेळ कामाची संधी मिळाली नाही तरी चालेल. पण,लोकांच्या सेवेची संधी न सोडण्याची शपथ गोपीनाथ मुंडे यांना अग्नि देताना मी घेतली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही' असंही पंकजा मुंडे म्हणाला. NHAI Recruitment: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण इथे 100 जागांसाठी पदभरती पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं वक्तव्य करत एका प्रकार पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा उघड केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या कार्यकारणी बैठकीला सुद्धा हजेरी लावली होती. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी पदाबद्दल बोलून दाखवल्यामुळे वेगळ्या वेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: