ठाणे, 29 ऑगस्ट : शरद पवारांचं पंतप्रधान (Sharad Pawar) व्हायचं स्वप्न अधूरंच राहणार आहे. खुद्द शरद पवारांनीच पंतप्रधान व्हायच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी सध्या 82 वर्षांचा आहे, मोरारजी देसाई (Morarji Desai) देखील 82व्या वर्षी पंतप्रधान झाले होते, पण मी हा कित्ता गिरवणार नाही. मी कोणत्याही प्रकारे सत्तेत सहभागी होणार नाही, तसंच सत्तेची जबाबदारीही घेणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
आगामी निवडणुका महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून एकत्र लढावी, असं आमचं मत आहे, पण त्यावर निर्णय झालेला नाही. आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जावं का याची चाचपणी करत आहोत, पण अजूनही निर्य झालेला नाही. समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं, असं माझं मत आहे, असंही पवार म्हणाले.
ठाण्यात अधिक लक्ष द्यायला हवं, असं का म्हणाले शरद पवार? #SharadPawar #MaharashtraPolitics pic.twitter.com/mI4GJxvNgX
— News18Lokmat (@News18lokmat) August 29, 2022
मोदी सरकारविरोधात पर्याय देण्यासाठी माझ्याच घरात बैठक झाली. हे लगेच होणार नाही. त्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहे. काही विषय ठरले आहे. त्यानुसार, निर्णय घेण्याचे ठरले आहे, असंही पवारांनी तिसऱ्या आघाडीबद्दल सांगितलं.
शरद पवार यांनी मविआबद्दल मोठं वक्तव्य केलं. #Maharashtra #SharadPawar pic.twitter.com/T81gKQWbk4
— News18Lokmat (@News18lokmat) August 29, 2022
भाजप नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवारांवर ईडीची कारवाई होईल, असा इशारा दिला होता. शरद पवारांनी यावरही भाष्य केलं आहे. 'कोणाचे खच्चीकरण करता येईल का ईडी लावता येईल का सीबीआय लावता येईल हा सारखे प्रयोग केले जात आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा असे प्रकार झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील काही लोक फोडले आणि सरकार स्थापन केले. झारखंडमध्येही आमदार फोडून सरकार स्थापन केले आहे. लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून आमदारांना आमिष दाखवून सत्ता घ्यायची हे भाजपा करत आहे. यंत्रणांचा वापर करून नवाब मलिक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना अटक करण्यात आली, अशी टीका पवारांनी केली.
'शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी ज्या प्रकारे सांगितले आहे की, 5 वर्ष लागणार आहे. त्यामुळे काही तरी जुळलं याचा संशय येत आहे. पण, सुप्रीम कोर्टामध्ये 5 वर्ष वाट पाहण्याची गरज वाटत नाही. पुढील एक दोन सुनावण्यांमध्ये याचा निर्णय लागू शकतो, असंही पवारांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sharad pawar अध्यक्ष