ठाणे, 07 सप्टेंबर : मुजोरी फेरीवाल्याच्या प्राणघातक हल्ल्यातून ( hookers attack) वाचलेल्या बहाद्दुर अधिकारी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर पिंपळे या भावुक झाल्या होत्या. तसंच, 'आपल्यावर झालेला हा हल्ला अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईतून होता' असा दावाही त्यांनी केला.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईदरम्यान एक भाजीविक्रेत्याने पिंगळे यांच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या हाताची दोन बोट तुटली. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
Corona Update: भारतात पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक लसीकरण, 24 तासांत नवा विक्रम
आज कल्पिता पिंपळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 8 दिवसांपासून ठाण्यातील खासगी रुग्णालयात पिंपळे यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातून बाहेर येताच कल्पिता पिंपळे भावुक झाल्यात.
माझी दोन बोटं गेली ठीक आहे, जर माझा जीव गेला असता तर माझा मुलगा अनाथ झाला असता. माझ्या भावाने बहिण गमावली असती. माझा भाऊ हा वायुदलात आहे. त्यामुळे मी त्यातील घाबरणारी नाही. पण, या हल्ल्यानंतरही मी माझे काम करत राहणार आहे. कारण ते आमचे कर्तव्य आहे, मी नवीन जोमाने काम करणार आहे, असं पिंगळे यांनी ठणकावून सांगितलं.
गाय वाहून गेली पण पोहत आली परत, लोकांनी घातली तोंडात बोटं LIVE VIDEO
'माझ्यावर करण्यात आलेला हल्ला हा फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे नसून मी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईच्या सूडबुद्धीने करण्यात आलेला हल्ला असल्याची पिंपळे यांनी दावा केला.
तसंच, लवकर बरी होऊन पुन्हा त्याच जोमाने कामाला लागणार असल्याची पिंपळे यांनी भावना व्यक्त केली आणि त्यांनी सर्वांचे आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.