मुंबई, 09 नोव्हेंबर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईत पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांवर खळबळजनक आरोप केले आहेत. नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांची एकूण पाच प्रकरण आहेत. नवाब मलिकांच्या या प्रकरणांचे पुरावे मी सांगितल्याप्रमाणं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांनी 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीकडून जमीन विकत घेतली. मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. हे सर्व पुरावे मी तपास यंत्रणा आणि शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शरद पवारांना देखील त्यांचे मंत्री काय कांड करतात हे कळू द्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
In such serious matter where underworld, bomb blast convicts have connections with Minister Nawab Malik, I will submit the documents to appropriate agencies for further investigation : #DevendraFadnavis@Dev_Fadnavis pic.twitter.com/YfxlBn0pVZ
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 9, 2021
दाऊदच्या निकटवर्तीयांकडून मलिकांच्या कंपनीनं जमीन विकत घेतली. कोट्यवधी रुपयांची जमीन मलिकांनी स्वस्तात विकत घेतली. तसंच स्टॅम्प ड्युटीमध्येही घोटाळा करण्यात आला असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. या सर्वांचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सर्व पुरावे शरद पवार आणि तपास यंत्रणांना देणार आहे. शरद पवार यांनाही समजू द्या, त्यांचे मंत्री काय करतात, असंही फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे आरोप
सरदार शहाबअली खान. हे 1993 च्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप होती आणि ती कायम केली. याच्याकडे मुंबई महापालिका आणि बीएसीची रेकी केली आणि टायगर मेमनच्या घरी तो होता. त्याने बॅाम्ब बनवत होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. सॅालिडस असे नाव आहे. फराझ मलिक नवाब मलिक यांच्या मुलाने खरेदी केली.त्यावेळी जमिनीचा दर काय होता ही जमीन 30 लाखात विकत घेतली होती, असा खुलासा फडणवीस यांनी केली आहे. सलीम पटेल हे दुसरे कॅरेक्टर आहे. आरआर पाटील बरोबर ज्या माणसाचा फोटो होता तो हा. हा हसिना पारकरचा ड्राईव्हर होता. दाऊद भारतातून गेल्यावर सर्व संपत्ती सलीम पटेलच्या नावे पावर ॲाफ अटर्नी होत होती. कुर्ल्यात 3 एकर जागा ज्याला गोवावाला कंपाऊड म्हणतात. जी एलबीएस रोडवर आहे. या जमिनीची रजिस्ट्री सॅालिटेअर नावाच्या कंपनीला विकली, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडताच नवाब मलिकांनी केलं नवं Tweet
कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास 3 एकराची जागा आहे. एलबीएस रोडवर अगदी महागडी जागा होती. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल यांनी मलिक कुटंबाच्या कंपनीला जमीन विकली. या कंपनीच्या वतीनं जागेच्या कागदपत्रांवर फराज मलिक यांनी सही केली आहे. आजही ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.