मुंबई, 2 मार्च : 'या रविवारी मी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब यावरील माझी खाती सोडण्याचा विचार करत आहे,' असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान मोदींनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील सोशल मीडिया सोडण्याच्या विचारात असल्याचं दिसत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोशल मीडिया सोडण्यासंदर्भातील ट्वीट शेअर करत अमृता फडणवीस यांनीही मोठी घोषणा केली आहे. 'काही वेळा आयुष्यातले छोटे निर्णय तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतात. मी माझ्या नेत्याच्या मार्गावर चालणार,' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे.
Sometimes it’s the smallest decision that can change our life forever ! I will follow the path of my leader !! https://t.co/D7l1iZcosS
दरम्यान, नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो केले जाणारे राजकीय नेते आहेत. इंस्टाग्रामवर 3 कोटी 52 लाख, ट्विटरवर 5 कोटी 33 लाख आणि फेसबुकवर 4 कोटी 45 लाख लोक मोदींना फॉलो करतात, तर नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 45 लाख सबस्क्राईबर आहेत.
दुसरीकडे, राहुल गांधीही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांचे ट्विटवरवर 12.1 मिलियन फॉलोअर्स तर फेसबुकवर 3 मिलियन फॉलोअर्स आहेत. फोटोसाठी लोकप्रिय असलेल्या इन्स्टाग्रामवरही राहुल गांधींचे अकाउंट आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे 9 लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर राहुल गांधींच्या नावाने चॅनेल आहे. या चॅनेलचेही 1 लाख 68 हजार सबस्क्रायबर्स आहेत.