मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मला रिटायरमेंट घ्यायची आहे, पण...' शेवटी राज्यपालांनी सांगूनच टाकलं!

'मला रिटायरमेंट घ्यायची आहे, पण...' शेवटी राज्यपालांनी सांगूनच टाकलं!

आता नेमकं काय म्हणाले राज्यपाल...

आता नेमकं काय म्हणाले राज्यपाल...

आता नेमकं काय म्हणाले राज्यपाल...

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 13 ऑगस्ट : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला होता. वरिष्ठांकडून माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना देशाने प्रगती केल्याचं दिसून येत आहे. विशेष करून मागील सात-आठ वर्षात देशाने भरपूर प्रगती केली आहे. ज्या घरात वीज नव्हती तिथं वीज आली, ज्या घरात शौचालय नाही तिथं शौचालय बनवण्यात आले. देशातील 33 कोटी लोकांचे बँकेत खातं उघडणे असो वा अशी अनेक काम होतं आहेत. त्यामुळे समाधान वाटतंय. यानंतर मला मला रिटायर्डमेंट घायची आहे, पण देत नाहीत असंही ते यावेळी म्हणाले. राज्यपालांच्या टोपीचा रंग अन्.. कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. मात्र आपल्या शेजारील देश देखील समृद्ध असावेत. आपले शेजारी कमजोर असतील तर त्याचा आपल्या देशावरही परिणाम होतो. त्यामुळे सर्वांचीच प्रगती होणं गरजेचं आहे. पंतप्रधान मोदी त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी म्हणाले.
First published:

Tags: BJP, Governor bhagat singh, Independence day

पुढील बातम्या