पुणे, 19 फेब्रुवारी: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवजयंती निमित्त केलेल्या भाषणातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना चिमटा काढला आहे. अजित पवारांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे जाणून घेण्यासाठी एका खास भाषेची गरज आहे. आणि ती भाषा मला शिकायची आहे, अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे. ते शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी किल्यावर भाषण करत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. या विधानानंतर व्यासपीठावर एकच हशा पिकला होता.
खरंतर शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. त्यामुळे ती भाषा मला आता शिकायची आहे. कारण दादांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे कळालं पाहिजे. किमान त्यासाठी तरी मला ती भाषा शिकायची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच व्यासपीठावर आणि उपस्थिती लोकांमध्ये हास्याचं वातावरण तयार झालं. यावेळी उद्धव ठाकरे शिवजयंती निमित्त शिवनेरीवर आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
(हे वाचा-India China Dispute: पँगाँग सरोवरापासून सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी किल्ले शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करत त्यांना अभिवादन केलं आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवनेरीवर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना हा चिमटा काढला आहे.
(हे वाचा-काही फूटांवरुन दहशतवाद्यांनी पोलिसांवर झाडल्या गोळ्या; थरारक घटना CCTV मध्ये कैद)
शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातील एक भाषा अजित पवारांनाही येते, असं माझ्या सहकाऱ्यानं सांगितलं. त्यामुळे आता ती भाषा मलाही शिकायची आहे. दादांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे कळण्यासाठी मला ती भाषा शिकायची आहे. मुख्यमंत्र्याच्या या मिश्किल भाष्यानंतर एकच हशा पिकला होता. यावेळी त्यांनी म्हटलं की, महाराजांपुढे नतमस्तक होण्यासाठी शिवजंयतीच असायला पाहिजे असं काही नाही. कोणतंही पवित्र काम करताना आपल्याला छत्रपचती आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. शिवनेरीवर येण्याचं हे दुसरं वर्ष आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रेमामुळे हा हा बहुमान मला लाभला आहे, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Uddhav thacakrey