मुंबई, 04 फेब्रुवारी : मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो की, मी वरळीतून राजीनामा देतो, निवडणूक घ्या आणि बघतो कसे जिंकता तुम्ही, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केल्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. आदित्य ठाकरे यांनी आता वरळी मतदारसंघाच्या निवडणुकीवरून एकनाथ शिंदेंना चॅलेंज दिलं आहे.
'आज संपूर्ण महाराष्ट्राच चित्र भगव आहे. इंडिया टूडेच्या सर्वे नुसार मविआ ला ३४ जागा लोकसभेत जागा येतील. आम्ही महाराष्ट्रासाठी 80 हजार कोटी गुंतवणूक आणली ह्यांच्या सारखी बोगस नाही आणली. मी चॅलेंज देत आहे निवडणूक घ्या आणि निवडून येऊन दाखवा, असं आव्हानच आदित्य ठाकरेंनी भाजपला केलं.
(उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याला दुजोरा)
'एवढी महाशक्तीसोबत आहे. तर मग निवडणुका तरी घ्या, निवडणुका महाराष्ट्रासाठी महत्वाच्या आहे. महापालिका असेल किंवा 40 गद्दारांच्या जागा असतील, मुख्यमंत्री शिंदे स्वत: राजीनामा देत आहे, एवढी सुद्धा ते हिंमत दाखवत नाही, असा सणसणीत टोलाही आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
(हेही वाचा : चिंचवडच्या पोटनिवडणुकीवरून 'पोस्टर वॉर', जगताप कुटुंबात उमेदवारीवरून वाद?)
'पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. या निवडणुका झाल्या आहेत, तशा मुंबई, कोल्हापूर, औरंगाबादमध्ये निवडणूक होण्याची आवश्यकता आहे. आता मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण लोकप्रतिनिधीच नसताना बजेट सादर केलं जाणार आहे. हे लोकशाहीसाठी किती गरजेचं आहे. जर घोटाळे झाले तर कोण जबाबदार असणार आहे, आम्ही सत्तेत आल्यावर याची चौकशी करणारच, प्रत्येकाची चौकशी करणार आहे, असंही आदित्य ठाकरेंनी बजावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cm eknath shinde