मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

टपरीवाल्याला मंत्री बनवलं, एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

टपरीवाल्याला मंत्री बनवलं, एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांवर पलटवार

http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2021/08/khadse-and-patil.jpg

http://cms.ibnlokmat.tv/wp-content/uploads/2021/08/khadse-and-patil.jpg

'एका टपरीवाल्याला मंत्रिपद देणारे बाळासाहेब ठाकरे होते. खडसे सुद्धा मंत्री झाले ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच...

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 20 डिसेंबर : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) आणि राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. 'पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम नाथाभाऊने केले. एका टपरीवाल्याला मंत्रीपद देणारे बाळासाहेब ठाकरे होते. मंत्री असताना तुमच्या मतदारसंघात कामे केली तर उपकार नाही केले' असं म्हणत एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना जशास तसे उत्तर दिले.

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाजप खासदार हेमा मालिनी यांच्या गाला सारखे रस्ते माझा मतदारसंघात केली असल्याचे सांगत एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली होती. तर आज प्रचार सभेतच एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार पलटवार केला.

'एका टपरीवाल्याला मंत्रिपद देणारे बाळासाहेब ठाकरे होते. खडसे सुद्धा मंत्री झाले ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. त्यामुळे आपण कुणामुळे मंत्री झालो हे त्यांनी  विसरू नये' असं म्हणत एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.

'पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील रस्त्याचे काम नाथाभाऊने केले. एवढंच नाहीतर दारूवाल्याला आमदार तर टपरीवर फिरणाऱ्याला आपण मंत्री केले. गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील रस्ते आपणच केले असून त्यांच्याच मतदारसंघात पाणी मिळत नसल्याचा आरोप खडसेंनी केला.

एकनाथ खडसे यांच्या आरोपाला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत 'माझ्या मतदारसंघात पाणीपुरवठ्यासाठी 27 कोटी रुपये मजूर केले असून खडसेंनी बोदवडसह 80 गावांची मंजूर केलेली पाणी पुरवठा योजना रखडली नाही. माझ्या गावातील रस्ता खडसेंनी केल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवावे. मी मंत्री असताना त्यांच्या मतदारसंघात काम करतो म्हणजे मी काय उपकार करत नाही. त्यांनी ही माझा मतदारसंघात कामे केली तर मंत्री होते म्हणून केले. असतील अशी प्रखर टीका गुलाबराव पाटील यांनी खडासेंवर केली आहे.

First published: