मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BIG NEWS ‘भाजपचा राजीनामा दिलेला नाही’, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा

BIG NEWS ‘भाजपचा राजीनामा दिलेला नाही’, एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा

खडसे यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र खडसे यांच्याकडून अधिकृतपणे त्याबाबत सांगितलं जात नव्हते. मात्र सायंकाळी खडसे यांनी खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली.

    मुंबई 18 ऑक्टोबर: नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली होती. खडसे हे लवकरत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी या आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. आपण भाजपचा राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी ANIशी बोलताना सांगितलं. खडसे यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र खडसे यांच्याकडून अधिकृतपणे त्याबाबत सांगितलं जात नव्हते. मात्र सायंकाळी खडसे यांनी खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली. तर एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत. असं करुन ते स्वत: चं नुकसान करुन घेणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही एकनाथ खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'चर्चाही केवळ चर्चा असते. त्याचा काहीही अर्थ नसतो. एकनाथ खडसे हे भाजप सोडून जाणार नाहीत याची मला खात्री आहे. खडसे हे अनुभवी आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत' असं पंकजा मुंडे यांनी सांगितले. काय म्हणाले होते फडणवीस? 'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दिली. तसंच, 'एकनाथ खडसे यांच्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. योग्यवेळी मी चर्चा करेल आणि मला पूर्ण विश्वास आहे की, खडसे हे योग्य निर्णय घेतील' असंही फडणवीस म्हणाले होते.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Eknath khadse

    पुढील बातम्या