पुणेरी पगडीवर पवार म्हणतात,"माझा तसा हेतू नव्हता"

पुणेरी पगडीबद्दल कुणाबाबत वैयक्तिक किंवा कुठल्या समूहाबाबत हे वक्तव्य नव्हतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 16, 2018 07:04 PM IST

पुणेरी पगडीवर पवार म्हणतात,

पुणे, 16 जून : पुणेरी पगडी न वापरण्याच्या निर्णयामुळे बरीच मंडळी दुखावली गेली. पण यात माझा काही दुसरा हेतू नव्हता असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात छगन भुजबळ यांच्या जाहीर सभेत झालेल्या पगडीच्या वादावर शरद पवारांनी आता स्पष्टीकरण दिलंय. मध्यंतरी मी पागोट्याबाबत काही बोललो त्यांची चर्चा देशभरात होतेय. ज्यांना आदर्श मानतो त्या महात्मा फुलेंचे पागोटे वापरावे हाच हेतू होता, पण त्या गोष्टीची खूप चर्चा झाली. त्यामुळे बरीच मंडळी दुखावली गेली. पण यात माझा काही दुसरा हेतू नव्हाता असं पवार म्हणाले.

राष्ट्रवादीतून पुणेरी पगडी हद्दपार, पवारांनी का घेतला निर्णय ?

तसंच पुण्याचा मला अभिमान आहे आणि मी इथे वाढलो आहे. दरम्यान पुणे आता बदलत आहे. ही चांगली बाब आहे. आता पुण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मुलींना 80 वर्षांनी का होईना प्रवेश मिळतोय. याचाच अर्थ पुणं बदलतंय असंही पवार म्हणाले.

पवारांनी भुजबळांना घातली फुले पगडी

Loading...

पुणेरी पगडीबद्दल कुणाबाबत वैयक्तिक किंवा कुठल्या समूहाबाबत हे वक्तव्य नव्हतं, असंही पवारांनी स्पष्ट केलं.

 

शरद पवारांचं स्पष्टीकरण

मध्यंतरी मी फुले पगडीवर भाष्य केले त्यानंतर अनेक चर्चा घडल्या. आपण आपल्या जीवनात एखाद्या व्यक्तीला आदर्श मानतो. मी माझ्या जीवनात तीन व्यक्तींना आदर्श मानतो, पहिले छत्रपती शाहु महाराज, दुसरे महात्मा फुले, तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महापुरुषांचे विचार समाजात कसे रुजवायचे हा प्रयत्न आम्ही करत असतो. शाहु महाराजांची पगडी सामान्य माणसांना उपलब्ध होत नाही. आपल्या राज्यात सातारा छत्रपती आणि कोल्हापूर छत्रपती यांना एक वेगळा मान आहे.

छत्रपती हा एकच असतो म्हणून त्यांची पगडी घालणे काही शक्य नाही. बाबासाहेबांनी कधी आपल्या सार्वजनिक जीवनात टोपी घातली नाही. महात्मा जोतिबा फुलेंनी आपले पागोटे घातले. या तीन आदर्शांचे काही तरी ठेवावे म्हणून मी फुलेंच्या पागोट्याचा पुरस्कार केला. पुण्याबाबत मला अभिमान आहे. पुण्यात वाढलो आणि शिकलोही. पूर्वीचे पुणे आता बदलत आहे. न्यु इंग्लिश स्कुलमध्ये मुलींना ८० वर्षांनी प्रवेश मिळाला, हे बदलाचे सूचक आहे.

महात्मा फुलेंनी शेतकरी, बि-बियाणे, महिला, महिला शिक्षण यांच्या हिताचे विचार मांडले. फुलेंनी वेळोवेळी आधुनिक विज्ञानाचा विचारही मांडला आहे. त्यामुळे हे पागोटे आणि हा माणूस काही लहान नाही. अशा माणसाच्या प्रतिकाचा पुरस्कार करणे गरजचे आहे. पुण्यात कधी जात पात बघितली गेली नाही, बघितली जाणारही नाही पण परिवर्तनाचा विचार, अाधुनिक विज्ञानाचा विचार, समतेचा विचार यासाठी आग्रह धरणाऱ्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे.

-शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2018 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...