Home /News /maharashtra /

मला हवी असलेली कागदपत्रं दिली नाही, तिसऱ्या समन्सनंतर अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

मला हवी असलेली कागदपत्रं दिली नाही, तिसऱ्या समन्सनंतर अनिल देशमुखांचं ईडीला पत्र

Anil Deshmukh ED Summons: दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने तिसरा समन्स (Summons) बजावला. अनिल देशमुख यांनी ईडीला उत्तर दिलं आहे.

    मुंबई, 05 जुलै: दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) तिसरा समन्स (Summons) बजावला. या समन्सनुसार अनिल देशमुख यांना आज सकाळी 11 वाजता देशमुख यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असं ईडीनं देशमुख यांना आदेश दिले आहेत, मात्र त्याआधी अनिल देशमुख यांनी ईडीला उत्तर दिलं आहे. ईडीनं पाठवलेल्या समन्सला अनिल देशमुखांनी पत्राद्वारे उत्तर दिलं आहे. मला जी कागदपत्रं हवी होती ती अद्याप ईडीकडून प्राप्त झाली नसल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलं हे. मी माझ्या कायदेशीर हक्कासाठी सर्वोच्च न्यायलायत गेलो असून ईडीला जे हवे ते सर्व सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ईसीआयआर कामरा प्राप्त नाही. सीबीआय तपास आणि ईडी चौकशी नेमकी कशाची अपेक्षित याची माहिती अपेक्षित असल्याचं अनिल देशमुख म्हणाले आहेत. हेही वाचा- अनलॉक कोल्हापूरचे लेटेस्ट अपडेट, पण...कोल्हापूरकरांनी हे लक्षात ठेवा अनिल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी ट्वीट करुनही याबाबतची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल. यापूर्वीही पाठवलं होतं पत्र याआधीही माजी गृहमंत्र्यांनी ईडीला पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात देशमुखांनी ईडीच्या चौकशीमध्ये आम्हाला कोणत्या बाबतीत प्रश्न विचारले जातील या बद्दल माहिती द्या. काही कागदपत्रं द्या आणि थोडा वेळ द्या, असं लिहिलं होतं. अनिल देशमुखांची सर्वोच्च न्यायालयात धाव ईडीचा ससेमीरा संपविण्यासाठी आता अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (Anil Deshmukh has filed a petition in the Supreme Court seeking protection from the ED) ईडीकडून तिसरे समन्स बजावण्यात आल्यानंतर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार आपल्याविरोधात सक्तीची कारवाई होऊ नये आणि आपलं संरक्षण व्हावं यासाठी देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी दोन वेळा ईडीने देशमुखांना समन्स बजावलं आहे, त्यावेळी कोरोना, आजारपण या कारणातून ते हा तपास पुढे ढकलत होते. आता तर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हेही वाचा- ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात, पुण्यातल्या गुंडगिरीचा LIVE VIDEO मुलालाही समन्स काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे (Sanjeev Palande) आणि पीए कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मुलगा ऋषिकेश देशमुख (Rishikesh Deshmukh) यांनाही ED ने समन्स बजावला आहे. ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Anil deshmukh, NCP

    पुढील बातम्या