मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही', नारायण राणेंनी पोलिसांच्या नोटीसीला दिले उत्तर

'मी व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही', नारायण राणेंनी पोलिसांच्या नोटीसीला दिले उत्तर

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत राणेंना धक्का दिला आहे.

प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुडाळ नगराध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीने बाजी मारत राणेंना धक्का दिला आहे.

कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे सांगितले. या नोटीसीला नारायण राणे यांनी उत्तर दिले

सिंधुदुर्ग, 29 डिसेंबर : शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे, वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)  यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर, 'मी सध्या व्यस्त असून चौकशीला येऊ शकत नाही' असं उत्तर राणे यांनी दिलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी नितेश राणे यांनी जामिनीसाठी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर मागील दोन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. तर आज सकाळी कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावून पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे सांगितले. या नोटीसीला नारायण राणे यांनी उत्तर दिले आहे.

'आपण अत्यंत व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. तसंच आणखी दोन तीन दिवस व्यस्तता असणार असून त्यानंतर येऊ शकेन, असं पत्र नारायण राणे यांनी कणकवली पोलीस स्थानकालापाठवून दिलं असल्याची सूत्रांची माहिती आहे.

(अनिरुद्धने संजनाला असं केलं बर्थडे विश, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट)

तसंच, 'आपण व्हिडीओ कॉन्फरन्सवर माझी जबानी घेऊ शकता, अशा आशयाचे पत्र नारायण राणेंनी कणकवली पोलीस स्थानकात दिले आहे.

आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली. या नोटीसीवरून भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला.  तर 'या प्रकरणात सत्तेचा दुरुपयोग चालू आहे. नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू, पोलिसांची दडपशाई आहे असे इशारे नारायण राणे यांनी  दिले. मग पोलिसांनी कारवाई केली तर त्यांची चूक काय आहे, असा मुद्दा अॅड. प्रदीप घरात यांनी  न्यायालयासमोर मांडला.

काय घडलं नेमकं ज्यामुळे राणेंना आली नोटीस?

28 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितेश राणे कुठे आहेत? तेव्हा नारायण राणे यांनी संतप्त होत म्हटलं, कुठे आहेत हे सांगायला मला काय तुम्ही मुर्ख माणूस समजलात का? कुठे आहेत हे जरी मला माहिती असेल तरी मी सांगणार नाही. तुम्हाला का सांगावं? असा सवालही नारायण राणेंनी केला. त्यामुळे नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस मिळाली. संतोष परब हल्ला प्रकरणी चौकशीसाठी हजर राहणेबाबत ही नोटीस आली. नोटीसनुसार, आज दुपारी 3 वाजता पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगितले होते. सीआरपीसी कलम 160 (1) अन्वये नोटीस पाठवण्यात आली होती.

First published: