मुलाच्या प्रचाराला वडील येणार नाहीत याचं दुःख : सुजय विखे-पाटील

मुलाच्या प्रचाराला वडील येणार नाहीत याचं दुःख : सुजय विखे-पाटील

  • Share this:

अहमदनगर,15 मार्च : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अहमदनगरमध्ये प्रचारासाठी जाणार नाही, असे गुरुवारी (14 मार्च) स्पष्टपण सांगितले होते. वडिलांच्या या विधानावर सुजय विखे-पाटलांनी दुःख व्यक्त केले आहे. ''वडील मुलाच्या प्रचाराला येणार नाही याचे दुःख आहे. तीन वर्षात मी कामं केली आहेत. परिवाराच्या नाही तर स्वतःच्या हिंमतीवर निवडणूक लढवणार आहे'', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

त्यापेक्षा मी प्रचार न केलेला बरा : राधाकृष्ण विखे-पाटील

राधाकृष्ण विखे-पाटलांना गुरुवारी पत्रकार परिषदेदरम्यान तुम्ही राष्ट्रवादी- काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार का?असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, 'कोणी कुठे प्रचार करायला जायचं, यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती जो निर्णय देईल त्याप्रमाणे मी प्रचार करेन. अहमदनगरमध्ये मी प्रचार करणार नाही, कारण जरी मी तिथे गेलो तरी माझ्या भूमिकेवर संशय घेतला जाईल, त्यामुळे अहमदनगरमध्ये न गेलेलंच बरं'. पण वडिलांच्या या विधानावर मात्र पुत्र सुजयनं दुःख व्यक्त केलं आहे.

बाळासाहेब थोरातांवर टीकास्त्र

बाळासाहेब थोरात ज्येष्ठ नेते आहेत,पण हायकमांड नाही. राज्यातील नेत्याने आम्हाला प्रश्न विचारू नये. दिल्लीतील हायकमांड उत्तर मागतील ते देऊ, असं म्हणत सुजय यांनी थोरातांवरही टीका केली आहे.

वाचा अन्य बातम्या

उस्मानाबादची उमेदवारी कोणाला मिळणार? गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात चुरस

...पण मुंबईकरांचे गेलेले प्राण पुन्हा येणार नाहीत : रोहित पवार

सुजय विखे-पाटलांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली

सुजय विखेंचं अहमदनगरमध्ये जंगी स्वागत

दरम्यान, सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदाच अहमदनगर दाखल झाले. यावेळेस त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. स्वागत मिरवणुकीत तरुणांचा मोठा सहभाग होता. यानंतर जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासही त्यांनी सुरुवात केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड तसंच शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची त्यांनी भेट घेतली. खासदार दिलीप गांधी यांच्याही भेटीची वेळ सुजय यांनी मागितली होती. पण ते मुंबईला असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ

First published: March 15, 2019, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading