नारायण राणे यांनी जाहीर केली 'शिवसेने'वर आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका

नारायण राणे यांनी जाहीर केली 'शिवसेने'वर आतापर्यंतची सर्वात मोठी भूमिका

मी शिवसेनेवर टिका करणार नाही याचा अर्थ माझ्या सहनशीलतेचा अंत सेनेने पाहू नये.

  • Share this:

दिनेश केळुस्कर, कणकवली 14 ऑक्टोंबर : महाराष्ट्रातल्या राजकारणातले आक्रमक नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा केलाय. शिवसेनेसोबतचं सगळं जुनं वैर विसरून मी जुळवून घ्यायला तयार आहे. मात्र हे एकतर्फी असू नये तर त्यासाठी शिवसेनेनही पुढाकार घ्यावा असं मतही नारायण राणे यांनी व्यक्त केलं. शिवसेनेने राजकीय हल्ले सुरूच ठेवले तर शिंगावर घ्यायलाही कमी करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या विकासासाठी शिवसेनेसोबत सहकार्यास तयार आहे असंही त्यांनी सांगितलं. पुढं जायचं असेल तर जुनं वैर विसरून जायला पाहिजे, किती दिवस त्याच गोष्टींवर आपण अडून बसणार आहोत असा सल्ला आपण नारायण राणे यांना दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

'निलेशने विचारलं शिवसेनेनं दिलेला त्रास विसरलात का?' नितेश राणे म्हणाले...

त्यावर राणे यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना हा खुलासा केला. नितेश राणे यांनी रविवारी दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं. तोच धागा पुढे नेत नारायण राणे यांनी आज ही भूमिका मांडल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढच्या काळात मोठ्या घडामोडी घडतील असे संकेत मिळत आहेत.राणे पुढे म्हणाले, मी शिवसेनेसोबत कटुता संपवायला तयार आहे. पण शिवसेनेने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. एकतर्फी निर्णय होणार नाही. मी दिल्लीत राहावं की महाराष्ट्रात हे मुख्यमंत्री फडणवीसच ठरवतील. राजकारणात आपल्या मनावर काही नसतं. भाजपा मला जिथे ठेवेल तिथे राहीन असंही त्यांनी स्पष्ट केलं.

'मूंछ नहीं, तो कुछ नहीं' निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांच 'मिशी'वरून भांडण

ते पुढे म्हणाले, 2024 ला युती नसेल तर भाजपाच एक नंबर पक्ष असेल असंही राणे म्हणाले. मी पक्ष बदलणं ही त्या त्या वेळची गरज होती. शिवसेनेत मला स्थान राहिलं नव्हतं. काँग्रेसने सहा महिन्यात मुख्यमंत्री करु असं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन पाळलं नाही म्हणून दोन्ही पक्ष सोडले असंही ते म्हणाले.

माझा भाजपा प्रवेश ही आता औपचारिकताच आहे. मंगळवारी(15 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांच्या कणकवलीत होणाऱ्या सभेत आमच्या सर्वांचा रितसर भाजपा प्रवेश होईल अशी माहितीही त्यांनी दिली.

'शिवसेने'वरून नितेश आणि निलेश राणे बंधूंमध्ये मतभेद

युतीचा धर्म शिवसेनेने पाळला नाही. शिवसेनेने उमेदवाराला AB फॉर्म देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यानी पण शिवसेनेला सांगून पाहिल. मी शिवसेनेवर टिका करणार नाही याचा अर्थ माझ्या सहनशीलतेचा अंत सेनेने पाहू नये. नितेश आणि निलेशच्या वादावर मी बोलणार नाही. चांगल्या वातावरणात निवडणूक व्हावी ही माझी इच्छा आहे. आम्ही शिवसेनेच्या गुंडाना घाबरणार नाही. या जिल्ह्यात गुंडगिरी करुन कोण परत जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

First published: October 14, 2019, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading