मला 'या' गॉसिपमध्ये इंटरेस्ट नाही - सुप्रिया सुळे

मला 'या' गॉसिपमध्ये इंटरेस्ट नाही - सुप्रिया सुळे

'खोटी आणी फसवी आश्वासनं देऊन आघाडीच्या नेत्यांना युतीत प्रवेश देत आहेत. हे सगळे मंत्री झाले तर सत्ता तशीही आमचीच राहणार आहे.'

  • Share this:

प्रशांत बाग,नाशिक 26 ऑगस्ट : राष्ट्रवादीला सध्या मोठी गळती लागलीय. दररोज कुठला नेता भाजप किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करतो. लोकसभा निवडणुकीत सुरू झालेली ही गळती न थांबता वाढतच आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याला जास्तच वेग आल्याने राष्ट्रवादीचे बडे नेते धास्तावले आहेत. ही गळती रोखायची कशी असा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. शरद पवारांच्या केवळ वलयात राहाता यावं यासाठी धडपडणारे नेते आता पवारांना काय वाटेल याचा विचार न करता पक्ष सोडून जात आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करतील असं बोललं जातंय. संवाद यात्रेवर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अशा चर्चांवर विश्वास नसल्याचं सांगितलं. मला अशा 'गॉसिप'मध्ये इंटरेस्ट नाही असंही त्या म्हणाल्या.

काँग्रेसचा हा बंडखोर नेता करणार मुख्यमंत्र्यांच्या यात्रेचं दणक्यात स्वागत!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे पक्ष सोडून जातायत, ते परत येणार आहेत. आयाराम-गयारामचा धंदा सगळ्याच पक्षांनी बंद करायला हवा. हे दडपशाही करणारं सरकार आहे. नाती प्रेमानं जोडली जातात, धाक दाखवून नाही. नेत्यांनी संवेदनशील असावं लागतं. खोटी आणी फसवी आश्वासनं देऊन आघाडीच्या नेत्यांना युतीत प्रवेश देत आहेत. हे सगळे मंत्री झाले तर सत्ता तशीही आमचीच राहणार आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

ही आहे भुजबळांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाण्याची जोरदार चर्चा आहे. गेले काही वर्ष भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज असून त्यांना डावलण्यात येत असल्याची त्यांची भावना आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संवाद यात्रा नाशिकमध्ये आली असतानाही छगन भुजबळांनी त्याला दांडी मारली. त्यामुळे भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याचा कुणालाच थागपत्ता लागत नव्हता. या सगळ्या राजकीय चर्चेवर छगन यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखीच बुचकळ्यात टाकणारी आहे. तुमच्या शिवसेना प्रवेशाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली असा थेट प्रश्न जेव्हा त्यांना विचारला तेव्हा ते म्हणाले मै यही हु, मै यही हु, मै यही हु. पण शिवसेना प्रवेशाच्या चर्चेचं खंडन मात्र त्यांनी केलं नाही.

उपमुख्यमंत्रीपद घेणार का? आदित्य ठाकरेंच्या उत्तराने सस्पेन्स कायम!

भुजबळ म्हणाले, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि माझ्या सूना सगळेच सुप्रिया सुळेंच्या संवाद यात्रेत आहेत. भुजबळांवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, सुरू असलेल्या कोर्ट कचेऱ्या आणि पक्षात होत असलेली उपेक्षा या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत येणार अशी चर्चा सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत. तर नाशिकमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मात्र अशी शक्यता नसल्याचं संकेत दिलेत. भुजबळांनी बाळासाहेबांना आणि शिवसैनिकांना दिलेला त्रास जनता विसरलेल नाही असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 05:39 PM IST

ताज्या बातम्या