मी कुठलेही दोन नंबरचे कामं करत नाही - मुख्यमंत्री

मी कुठलेही दोन नंबरचे कामं करत नाही - मुख्यमंत्री

सूत्रसंचालकांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना फडणवीस हे राज्यातले दोन नंबरचे तरुण मुख्यमंत्री आहेत असं 'दोन' या शब्दांचा वापर करत कोटी करण्याचा प्रयत्न केला होता.

  • Share this:

नागपूर 30 जून : नागभूषण फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 2017चा नागभूषण पुरस्कार 'व्हाइस चिफ ऑफ एअरस्टाफ' निवृत्त शिरीष देव यांना आज देण्यात आला आहे. तर 2018चा नागभूषण पुरस्कार प्रख्यात क्रिडा प्रशिक्षक विजय बारसे यांना देण्यात आलाय. बारसे यांनी झोपडपड्डीतील मुलांमधून फुटबॉलपटू घडविले. अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'झुंड' हा चित्रपट बारसे यांच्यावर तयार झाला होता. नागभुषण पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुण म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मी कुठलेही दोन नंबरचे काम करत नाही असं सांगत सगळ्यांचीच फिरकी घेतली.

सूत्रसंचालकांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताना फडणवीस हे राज्यातले दोन नंबरचे तरुण मुख्यमंत्री आहेत असं 'दोन' या शब्दांचा वापर करत कोटी करण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्री जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी त्या कौतुकाचा धागा पकडत मी कुठलेही दोन नंबरचे काम करत नाही असं सांगितलं आणि सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूरची स्व:ताची वेगळी ओळख आहे, नागपूरकरांसाठी जगात सर्वात चांगले आईस्क्रीम म्हणजे  दिनशा तर हल्दीराम जगातील सर्वोत्तम हलवाई आहेत. सर्जिकल स्ट्राईक झाले त्या दिवशी एअर मार्शल देव यांच्या घरी दिल्लीला गेलो होतो आणि माहिती घेतली होती. देव यांनी सांगितलं की आत्तापर्यंत केवळ सरकारी इच्छाशक्ती अभावी सर्जिकल ट्राईक करण्यात आले नव्हते.

'माझ्या बंगल्यासमोर नेत्यांच्या रांगा'

'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या पक्षात राहायला तयार नाहीत. त्यामुळेच आपल्या मुंबईतील बंगल्याावर त्यांच्या नेत्यांच्या रांगा लागलेल्या असतात,' असा दावा करत भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभा निवडणूक भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. जळगावात झालेल्या भाजपच्या विस्तार सभेत गिरीश महाजन बोलत होते.

'आघाडीचे नेते भाजप प्रवेशासाठी इच्छुक असल्याने पुढे पाहू, असं म्हणून आपल्याला त्यांना टाळावं लागत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत,' अशी खोचक टीका गिरीश महाज यांनी केली आहे.

<

First published: June 30, 2019, 7:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading