'मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही', अशोक चव्हाणांचे मोठे विधान

'मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही', अशोक चव्हाणांचे मोठे विधान

'आज महाविकास आघाडी सरकारमध्ये काही जण बिघाडी करण्याचे काम करत आहे. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही'

  • Share this:

नांदेड, 22 जानेवारी : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ह पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) स्थापन केले. पण अलीकडे राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी सुद्धा मुख्यमंत्रिपदाबद्दल वक्तव्य केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील भोकरमध्ये विकास कामांच्या शुभारंभ काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. या वेळी बोलत असताना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल आपली इच्छाच बोलून दाखवली.

'मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मनापासून साथ देत आहे', असं वक्तव्य अशोक चव्हाण केले. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम चालू असल्याचे सांगून आघाडीत मला बिघाडी करायची नाही., असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

तसंच, 'आज महाविकास आघाडी सरकारमध्ये काही जण बिघाडी करण्याचे काम करत आहे. पण, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. प्रामाणिकपणे आम्ही ज्या पक्षाशी बांधिलकी बांधली आहे. सोनिया गांधी यांनी आम्हाला जो आदेश दिला आहे. त्यानुसार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शरद पवार, अजित पवार ही सर्व मंडळी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. पुढील पाच वर्ष महाविकास आघाडी सरकारला साथ देईल, असंही चव्हाण म्हणाले.

'हे महाविकास आघाडी सरकार आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला म्हणून सरकार स्थापन झाले. या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही भाजपला रोखण्यात यशस्वी राहिलो आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात विकास कामे जी झाली आहे ती केवळ महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यामुळे झाली आहे', असं अशोक चव्हाण म्हणाले.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनीही सुद्धा दोन दिवसांपूर्वी सांगलीमध्ये एका कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबद्दल इच्छा बोलून दाखवली होती. पण, शरद पवार यांनी 'मलाही मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण तसे काही होणार नाही', असं म्हणत जयंत पाटलांच्या इच्छेवर पाणी फेरले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 23, 2021, 9:15 AM IST
Tags: Congress

ताज्या बातम्या