Home /News /maharashtra /

'उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणाची आतुरता आहे मला', पंकजा मुंडेंचं मोठं विधान

'उद्धवजी ठाकरे यांच्या भाषणाची आतुरता आहे मला', पंकजा मुंडेंचं मोठं विधान

'आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे. उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर आहे. आज ते जनहितासाठी चांगल्या घोषणा करतील.

'आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे. उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर आहे. आज ते जनहितासाठी चांगल्या घोषणा करतील.

'आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे. उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर आहे. आज ते जनहितासाठी चांगल्या घोषणा करतील.

  बीड, 15 ऑक्टोबर : भाजपच्या (bjp) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (pankaja munde) यांनी आज दसऱ्या मेळाव्यातून आपल्याच पक्षाला घरचा अहेर देत जोरदार टोलेबाजी केली. यावेळी पंकजा मुंडे यांनी 'शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची आतुरता आहे', असं म्हणताच सर्वांच्या भुवया उंचावल्या. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने सरकार पाडण्याचे मुहुर्त देणे बंद करावे, असा घरचा अहेरच पंकजांनी दिला आहे. (Pankaja munde dasara melava 2021) दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावात भगवानबाबा भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी विराट दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षाला चार खडेबोल सुनावले आहे. 'प्रत्येक नेता उठतो आणि सांगतो हे सरकार पडणार आहे. विरोधी पक्षातील प्रत्येक नेता हे सरकार कधी पडणार हे सांगत आहे. अन् सत्ताधारी पक्ष सांगत आहे, सरकार कधीच पडणार नाही. पण, सरकार पडणार यातून तुम्ही कधी बाहेर येणार आहात की नाही. विरोध पक्ष रोज मुहूर्त देत आहे, सरकार मजबूत असणे आणि कधी पडणार यापेक्षा जनतेसाठी काय असणार आहे, याच्यावर बोला' असा टोलाच पंकजांनी भाजप नेत्यांना लगावला. 'प्रयोग म्हणून सरकारी रुग्णालयात जबरदस्ती पादायला लावायचे', नर्सचा खळबळजनक आरोप तसंच, 'आज उद्धव ठाकरे यांचा मेळावा आहे. उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी आतूर आहे. आज ते जनहितासाठी चांगल्या घोषणा करतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहे, एकमेकांनी खूश करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांना शोभणाऱ्या काय भूमिका घेता हे पाहण्याचं ठरणार आहे' अशी भूमिकाही पंकजांनी मांडली.

  घरात सहज वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत भयंकर धोकादायक

  'गुन्हेगारीकरण राजकारणातलं कमी करण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विरोधी पक्षनेता म्हणून रान उठवलं तेव्हा सत्ता परिवर्तन झालं. त्यामुळे आता आपण विरोधी पक्षाने विरोधकांच्या भूमिकेत आणि देशाच्या जनतेच्या हितासाठी लक्ष केंद्रीत केलं पाहिजे' असं म्हणत पंकजांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता टोला लगावला. धनंजय मुंडेंना टोला 'पण केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या. असं करेन अन् तसं करेन. आता काय बीड जिल्ह्याची अवस्था आहे, आहे का रुपया तरी, बजेट. माझ्याच योजना सुरू आहे, सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं. आपलं मंत्रिपद भाड्याने दिले आहे. यांचं चालत नाही, तुम्ही चांगलं काम करा. जनतेच्या हिताचे काम करा, आम्ही जाहीर अभिनंदन करू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. अमित शाहांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, आळवले शांततेचे सूर 'रोज स्त्रीयांच्या समस्या वाढल्या आहे. सोनपेठमध्ये महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना वाढत आहे. महिलांकडे वाकड्या नजराने बघणाऱ्यांना पायाखाली घालण्याऱ्या अहिल्यादेवींची ही भूमी आहे. आम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं. जी माऊली तुमच्यासाठी उपास तपास करते, जी माऊली पत्नीचे कर्तृव्य पार पाडते, त्यांच्या हक्कासाठी तुम्हाला जाब विचारायचा की नाही, असा थेट सवालही पंकजा मुंडेंनी विचारला.
  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या