...म्हणून मी बीडची 'गृहमंत्री' - पंकजा मुंडे

...म्हणून मी बीडची 'गृहमंत्री' - पंकजा मुंडे

बुधवारी झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हे चार वेळा भाजप सत्तेत होतो तेव्हाचे आहेत, महाराष्ट्रात आम्ही चार वेळा सत्ता भोगून नंतर बघू असं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 12 डिसेंबर : बुधवारी झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल हे चार वेळा भाजप सत्तेत होतो तेव्हाचे आहेत, महाराष्ट्रात आम्ही चार वेळा सत्ता भोगून नंतर बघू असं राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. 5 राज्यांच्या विधानसभा निकालांचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही. लोकसभेत आम्ही दणदणीत विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

देशाचे पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचेच असतील तर इतर राज्यांत आम्हीच सत्तेत येऊ हा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्रात मुख्यमंत्रीदेखील भाजपचाच असेल असा आत्मविश्वास पंकजा मुंडे यांनी दर्शवला आहे. परळी येथील गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गँगवॉर संपून महाराष्ट्रात सुरक्षा काय असते ते मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना दाखवून दिलं. तसं बीड जिल्ह्यातील गँगवॉर बंद करण्याचं काम मी केलं आहे. बीड जिल्ह्यापुरती का होईना मी गृहमंत्री आहे असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक माणूस आरोग्यदायी असावा म्हणून हा कार्यक्रम घेत आहे. मुंडे साहेबांच्या आठवणी काळाप्रमाणे गडद होत आहेत. बीड जिल्ह्यातील दुष्काळी लोकांना सेवा द्यावी म्हणून हा आरोग्य यज्ञ आम्ही हाती घेतला आहे.

या कार्यक्रमामुळे मोफत औषधं, ऑपरेशन आणि रोग निदानाचा लाभ सामान्य लोकांना मिळणार आहे. सरकरी यंत्रणा आणि खासगी डॉक्टर्स यांनी सहभाग नोंदवला आहे. हे आरोग्य शिबीर नसून हा यज्ञ आहे असं म्हणत त्यांनी लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमास पशु व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री राम शिंदे हेदेखील उपस्थित होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. यात ऊसतोड मजूर, गरजू शेतकरी यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

VIDEO : फॅन, टीव्ही, वेगळं टाॅयलेट अशी असेल मल्ल्याची कोठडी

First published: December 12, 2018, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading