मी दगडाच्या काळजाचा नाही- दिवाकर रावते

ते म्हणाले, 'आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खूप देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात तुमच्याविषयी राग नाही. मी पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करीन.'

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2017 01:17 PM IST

मी दगडाच्या काळजाचा नाही- दिवाकर रावते

21आॅक्टोबर : मी दगडाच्या काळजाचा नाही,मी पण व्यथित झालो आहे, हे उद्गार आहेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे. एसटी संप संपल्यानंतर ते IBNलोकमतशी बोलत होते.

ते म्हणाले, 'आतापर्यंत कर्मचाऱ्यांना खूप देण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात तुमच्याविषयी राग नाही. मी पुन्हा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करीन.'

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला, तेव्हा रावते आणि कर्मचारी यांच्यातल्या चर्चा फिस्कटत होत्या. बरीच चर्चा झाल्यावर अखेर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उच्चस्तरीय समिती तयार केली जाणार आहे, तसंच अंतरिम वाढ देण्याबाबतचा निर्णय 15 नोव्हेंबरपर्यंत घ्यावा, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...