मीही अंधश्रद्धाळू,सिद्धीविनायक मंदिरातूनच पोस्टिंगबाबत फोन केले-नांगरे पाटील

मीही अंधश्रद्धाळू,सिद्धीविनायक मंदिरातूनच पोस्टिंगबाबत फोन केले-नांगरे पाटील

'ज्या गणपती बाप्पाच्या नावाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते. जो विद्यार्थ्यांला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो. अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो. मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो पण पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही'

  • Share this:

विकास भोसले, सातारा, 20 सप्टेंबर : गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे. सिध्दीविनायक मंदीरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेले आहेत. इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे, असं विधान कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी सातारा इथं केलं.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते.

नांगरे पाटील म्हणाले की, 'डीजेवर आवाज कमी ठेवा. मंजूळ गीतं लावा. भावगीतं, भक्तीगीतं लावा. त्यातून गणपती प्रसन्न होतो. गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे. मी गणपतीच्या पुस्तकातून शिकून आलोय. मी एवढा अंधश्रद्धाळू आहे. सिध्दीविनायक मंदिरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेले आहेत. इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे.'

नांगरे पाटील पुढे म्हणतात, ज्या गणपती बाप्पाच्या नावाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते. जो विद्यार्थ्यांला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो. अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो. मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो पण पोलिसांना मात्र का टेन्शन देतो हेच कळत नाही. टेन्शन दूर करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे असं आवाहनही त्यांनी केलं.

आमच्याही घरी पाच दिवस गणपती होते. पण बऱ्याचवेळा मला आरतीलाही उपस्थित राहता येत नव्हते. ही परिस्थिती पोलिसांची असते. पोलिसांना 12, 14, 18 तास उभे राहावे लागते. त्यातून अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. त्यांना कायद्याची दंडुक्‍याची भाषाही दाखवावी लागते. तरी पण का नागरीक शास्त्र शिकवावे लागते, असा प्रश्‍न करून नांगरे-पाटील म्हणाले, नियम उपनियम, न्यायालयाचे निर्देश हे आपल्या भल्यासाठी आहेत. नियमाचे बंधन घालून संवादातून आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत, असंही ते म्हणाले.

====================================================================

VIDEO: सुपरवायझरने चेष्टेनं गुदद्वारात सोडली हवा, कामगाराचा मृत्यू

First published: September 20, 2018, 4:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading