मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बर्थ डे पार्टी शेवटची ठरली; हुंदई क्रेटा ट्रॅक्टरवर आदळली, 4 मित्र गमावले!

बर्थ डे पार्टी शेवटची ठरली; हुंदई क्रेटा ट्रॅक्टरवर आदळली, 4 मित्र गमावले!

रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली..

रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली..

रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली..

  • Published by:  sachin Salve
हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 16 डिसेंबर : वाढदिवसाची पार्टी करून घरी येत असताना पाच मित्रांवर काळाने घाला घातला आहे. चंद्रपूर (Chandrapur) मूल मार्गावर ट्रॅक्टर आणि कारचा  भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील अजयपूर इथं ही घटना घडली आहे. मूल शहरातील रहिवासी असलेल्या योग गोगरी (वय 23) याचा 15 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने योगने आपल्या मित्रांना पार्टी देण्याचे ठरवले होते. दर्शना उधवाणी ( वय 25), प्रगती निमगडे (वय 24), मोहम्मद अमन (वय 23) आणि स्मित पटेल (वय 25) या चार मित्रांसह योग हुंदई क्रेटा गाडीने चंद्रपूर इथं एका हॉटेलमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. वजनावर भारी 6 वनौषधी; आयुर्वेदीक उपचारांनी लठ्ठपणा करा कमी रात्री उशिरा पार्टी करून घरी येत असताना अजयपूर इथं अचानक एक ट्रॅक्टर अचानक शेतातून मुख्य मार्गावर आला, त्यामुळे भरधाव वेगात असलेली हुंदई क्रेटा गाडी ट्रॅक्टरवर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, हुंदई क्रेटा गाडीचा यात चुराडा झाला. रात्री अचानक जोरात आवाज झाल्यामुळे गावाकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी जखमी मुलांना कारमधून बाहेर काढले आणि उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात  दर्शना उधवाणी, प्रगती निमगडे, मोहम्मद अमन आणि स्मित पटेल  यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मूल येथील प्रतिष्ठित व्यापारी घरातील मुलं होती.  तर योग गोगरी हा अपघातात जखमी झाला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. केंद्र सरकार पाकिस्तान किंवा बांगलादेशचे नाही ना? मेट्रो कारशेडवरून सेनेचा सवाल चार तरुण मुलांचा अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळे मुल गावावर शोककळा पसरली आहे. चारही जणांवर आज मुल गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
First published:

पुढील बातम्या