मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nawab Malik vs Devendra Fadnavis: "उद्या 10 वाजता मुंबईत हायड्रोजन बॉम्ब फुटणार''

Nawab Malik vs Devendra Fadnavis: "उद्या 10 वाजता मुंबईत हायड्रोजन बॉम्ब फुटणार''

 'देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे'

'देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे'

फडणवीस यांची पत्रकार परिषद (Press conference) होताच मलिकांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावलेत.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 09 नोव्हेंबर: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीआधी दिला होता. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांबाबत मोठा बॉम्ब फोडला आहे. फडणवीस यांची पत्रकार परिषद (Press conference) होताच मलिकांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन त्यांचे आरोप फेटाळून लावलेत. तसंच उद्या 10 वाजता मुंबईत हायट्रोजन बॉम्ब फुटणार असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती फटाके फोडू म्हणून मात्र यांचे फटाके भिजलेले होते, असं मलिक यांनी म्हटलं आहे. दाऊदला धरून गोपीनाथ मुंडे यांची भाषणे सभागृहात झाली. एका जागेला धरून आज तुम्ही आरोप केलात की कवडीमोल भावावर  जमीन घेतली पण तुमची माहिती अर्धवट होती, असं म्हणत उद्या 10 वाजता सांगेन देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डचे संबध कसे आहेत, असा इशारा नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिला आहे.

नवाब मलिकांचं स्पष्टीकरण 

1984 ला तेथे एक इमारत बांधली गेली. मुनिरा पटेल यांनी रस्सीवाला यांना जागा डेव्हल्पमेंन्टसाठी दिली. आमचे तेथे गोडाऊन आहे. अजून त्या जागेत काही दुकाने आहेत. 9 नोव्हेंबर 1999 ला मी निवडणूक लढलो होतो. त्याच जागेत कार्यालय होतं. तिथेच निवडणुकीचा जल्लोष केला. मुनिर पटेल यांनी ती जागा आम्हाला दिली पाॅवर ऑफ अटर्नी बरोबर आम्ही व्यवहार केला. सरदार वली खानचा त्यांनी उल्लेख केला त्याचे आजही त्या जागेत त्याचे कार्यालय आहे. गोवावाला परिवाराचे वाॅचमन म्हणून वली खानचे वडील काम करायचे. आम्ही300 मीचे पैसे देऊन व्यवहार केला. तेथे एक बिअर बार होता तो जास्त पैसे देऊन सरेंडर केला, असं मलिकांनी सांगितलं आहे.

आम्ही कोणत्याही आरोपी बरोबर व्यवहार केला नाही. मालकीनेने स्वत: जमीन दिली. फडणवीस यांनी राईचा पर्वत उभा केला. कोणत्याही एजन्सीकडे जा मी तयार असल्याचंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.  सगळी कागदपत्रे सरकारी कार्यालयात आहेत, असंही ते म्हणालेत.

20 रूपये फूट अशी जमीन खरेदी केली हा आरोप खोटा असल्याचं नवाब मलिकांनी म्हटलं आहे. माझे कधीही अंडरवल्डचे संबध नाहीत तुम्ही आता खेळ सुरू केलाय उद्या मी हायड्रोजन बाँम्ब फोडणार असल्याचा इशारा मलिकांनी फडणवीसांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या शहराला हाॅस्टेज बनवले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आयटम बाॅम्ब फोडला, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडताच नवाब मलिकांनी केलं नवं Tweet

मी कोणत्याही अंडरवल्ड बरोबर व्यवहार केला नाही, असं सांगत उद्या देवेंद्र फडणवीस यांची लोकं प्लाॅट बळावत आहेत ते सांगेन, असं मलिक म्हणालेत. पाॅवर ऑफ ॲटर्नी कडून व्यवहार करा असं मालकाकडून सांगितलं. माझी मुलगी उद्या फडणवीस यांना नोटीस देणार आहे. मी कोणत्याही अंडरवर्ल्डला ओळखत नाही सलीम पटेल यांच्याकडे पाॅवर ऑफ ॲटर्नी होती म्हणून व्यवहार त्यांच्याशी केला. सलीम पटेल असा कोण आहे हे मला माहित नव्हते, असंही मलिकांनी स्पष्ट केलं आहे.

त्या जागेत वेगळी सोसायटी सुद्धा आहे. सरदार पटेल हा बाँम्ब स्फोटाचा आरोपी आहे ते जगाला माहित आहे. सरदार पटेल यांनी काही जमीन नावावर चढवून घेतली होती म्हणून पैसे देऊन ही जागा घेतली. इक्बाल कासकरचे घर सनातनने घेतले आहे.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Nawab malik