'हैदराबादच्या सिंघम'चा हा पहिलाच एन्काऊंटर नाही, याआधीही घडला होता असाच प्रकार!

'हैदराबादच्या सिंघम'चा हा पहिलाच एन्काऊंटर नाही, याआधीही घडला होता असाच प्रकार!

हैदराबादमधील या एन्काऊंटरवर प्रकरणावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

  • Share this:

हैदराबाद, 6 डिसेंबर : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळी तपास करण्यासाठी गेले असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. यामध्ये चारही आरोपी ठार झाले आहे. दरम्यान, आम्ही आरोपींना शरण जाण्यासाठी सांगितले तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला अशी माहिती सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी सांगितलं.

हैदराबादमधील या एन्काऊंटरवर प्रकरणावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 'पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटवर केल्याने पीडितेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला,' अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत. मात्र त्याचवेळी 'कोणतीही शिक्षा ही कायद्याच्या चौकटीतच व्हायला हवी, त्यासाठी आग्रह धरायला हवा,' असाही मतप्रवाह समोर येत आहे. या सर्व एन्काऊंटर प्रकरणात सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार चर्चेत आले आहेत. मात्र सज्जनार यांनी केलेला हा पहिलाच एन्काऊंटर नाही. याआधी 2008 मध्येही सज्जनार यांच्या टीमने आरोपींचा एन्काऊंटर केला होता.

काय घडले होते 2008 च्या चकमकीत?

ही घटना वर्ष 2008 ची आहे. आंध्र प्रदेशातील वारंगल येथे तीन आरोपी पोलीस कोठडीत होते. या तिन्ही जणांवर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 2 विद्यार्थ्यांवर अॅसिड फेकल्याचा आरोप होता. पोलिसांनाही इथल्या घटनेचे दृश्य पुन्हा तयार करायचे होते. येथे हे तीन आरोपी पोलिसांवर अ‍ॅसिड फेकून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यावेळी एसपी सीपी सज्जनार हे एकटेच होते. 11 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या वारंगलमध्ये पोलिसांनी अॅसिड हल्ला प्रकरणातील चकमकीत आरोपीला ठार मारलं. त्यावेळी सीपी सज्जनार वारंगलमध्ये एसपी होते.

एन्काऊंटरचा प्लान आधीच झाला असल्याचा आरोप

इंग्रजी वृत्तपत्र डेक्कन क्रॉनिकल यांनी एका अहवालात दावा केला आहे की, घटनेच्या 24 तासांनंतर पोलिसांनी इतर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली. 30 नोव्हेंबरला वर्तमानपत्राने हा अहवाल प्रसिद्ध केला. या प्रकरणात पोलिसांव्यतिरिक्त मुख्यमंत्री केसीआर यांच्यावरही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. वर्तमानपत्रानुसार, आरोपींना अटक होण्यापूर्वी पोलीस आयुक्त सी.पी. सज्जनार(Cp sajjanar)यांनी आरोपीला धडा शिकवण्यासाठी चर्चा केली होती.

हैदराबादचे सिंगम सज्जनार यांच्याबद्दल...

सायबराबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी या घटनेत यापूर्वीही एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन पोलीस हवालदारांना निलंबित केलं आहे. सज्जनार हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. तसेच, स्पेशल इंटेलिजन्स ब्रँचच्या आयजीपदी आणि त्याच ब्रँचच्या डेप्युटी आयजी पदही त्यांनी कामकाज केलं आहे. साबराबदच्या कमिशनरपदी नियुक्ती झाल्यानंतरही पत्रकारांशी बोलताना, मुलं आणि महिलांची सुरक्षा हेच आपलं प्राधान्य असल्याचं सज्जनार यांनी म्हटलं होतं. जनगाव येथून अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सज्जनार यांनी आपल्या आपीएस करिअरची सुरुवात केली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: December 6, 2019, 2:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading