डॉक्टरकडून वकिल पत्नीचा खून, Heart Attack आल्याचा केला बनाव

डॉक्टरकडून वकिल पत्नीचा खून, Heart Attack आल्याचा केला बनाव

जामनेर येथील पोलीस स्थानकात डॉक्टर पतीसह सासऱ्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

जळगाव, 15 जानेवारी : जिल्हा न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील असलेल्या महिलेचा पतीने तोंड व नाक दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर येथील पोलीस स्थानकात डॉक्टर पतीसह सासऱ्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राखी भरत पाटील असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. चारित्र्याच्या संशयातून पत्नीला संपवलं असल्याची कबुली आता आरोपी पती डॉ. भरत पाटीलने दिली आहे. पेशाने वकील असलेल्या राखी पाटील यांचे समव्यावसायिक बांधव, पक्षकारांशी संबंध यायचे. त्यातच विलासी वृत्ती असल्याने पती डॉ. भरत पाटीलला ते रुचले नाही.

चारित्र्याचा संशय बळावल्याने त्याने पत्नी राखीचा हाताने तोंड दाबून खून केला. तशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पण कबुली देण्याआधी आरोपीने आपल्या पत्नीचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झालाचा बनवा रचला होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सत्य सांगितले.

दरम्यान, आरोपी डॉ.भरत याचेही एका तरुणीसोबत विवाहबाह्य संबंध होते. तो या तरुणीवर प्रचंड पैसे खर्च करत होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी अॅड.राखी यांच्याकडून 58 हजार रुपये घेतले होते. तसेच पैशांच्या कारणावरून त्यांनी पत्नी राखी यांचा खून केला, असा आरोप महिलेचे चुलत भाऊ रूपेश सूर्यवंशींसह माहेरच्या लोकांनी केला होता. त्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीच्या चौकशीअंती त्याला अटक करण्यात आली.

VIDEO :'...बंगले मे शिशे की नाहणी' नवनीत राणांचा उखाणा व्हायरल

First published: January 15, 2019, 2:20 PM IST

ताज्या बातम्या