घरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले

घरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले

नांदेड शहराजवळच्या धुमाळवाडीत ही घटना घडली. यात पती गंभीर भाजला . तर पत्नी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • Share this:

नांदेड, 07 जुलै : घरगुती वादातून संतप्त पत्नीने आपल्या पतीच्या अंगावर  उकळलेले तेल ओतले . नांदेड शहराजवळच्या धुमाळवाडीत ही घटना घडली. यात पती गंभीर भाजला . तर पत्नी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फत्तेजंगपूर - धुमाळवाडी येथील बेबी देवीदास धुमाळ ही महिला गेल्या काही दिवसांपासून एका हॉटेलमध्ये काम करत होती. तिचा पती देवीदास हा देखील दुसऱ्या एका हॉटेलमध्ये काम करायचा. एकाच हॉटेलमध्ये दोघे काम करू असा देवीदास याचा आग्रह होता. याच कारणावरून पती - पत्नी मध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

हेही वाचा

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

VIDEO : टॉयलेटला गेले अन् कमोडमध्ये बसले होते नागोबा !

पावसाळ्यात 'या' ठिकाणांवर आहे पर्यटनासाठी बंदी

शुक्रवारी सायंकाळी  देवीदास अंगणात बसला होता. स्वयंपाक  झाल्यावर  पत्नी बेबीने त्याला जेवण करण्यासाठी घरात बोलावले. देवीदास घरात येताच बेबीने कढईत   उकळलेले  गरम तेल त्याच्या अंगावर ओतले.  यात तो गंभीर भाजला. देवीदास याच्या फिर्यादीवरुन  सिडको ग्रामीण पोलिसांनी पत्नी बेबी धुमाळ विरोधात गुन्हा दाखल करून तिला तब्यात घेतले.

First published: July 7, 2018, 9:04 AM IST

ताज्या बातम्या