Home /News /maharashtra /

Bhandara: भांडणानंतर पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून, तीन वर्षांच्या चिमुकल्यासमोर दोघांचाही तडफडून मृत्यू

Bhandara: भांडणानंतर पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून, तीन वर्षांच्या चिमुकल्यासमोर दोघांचाही तडफडून मृत्यू

तीन वर्षांच्या चिमुकल्यासमोर भांडण; वादानंतर आई-वडिलांनी घेतलं एकमेकांना पेटवून, दोघांचाही होरपळून मृत्यू

तीन वर्षांच्या चिमुकल्यासमोर भांडण; वादानंतर आई-वडिलांनी घेतलं एकमेकांना पेटवून, दोघांचाही होरपळून मृत्यू

Husband wife died: तीन वर्षांच्या मुलासमोर पती आणि पत्नी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर संतापलेल्या पती आणि पत्नीने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतलं.

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 16 जानेवारी : पती आणि पत्नी यांच्यात किरकोळ कारणांवरुन वाद होतच असतात. त्यानंतर काही वेळाने दोघेही एकमेकांसोबत बोलू लागतात. पण भंडाऱ्यातून (Bhandara) एक वेगळीच घटना समोर आली आहे. पती आणि पत्नी यांच्यात शुल्लक कारणावरुन झालेला वाद (an argument over minor dispute) इतका विकोपाला गेला की त्यानंतर पती आणि पत्नीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. या घटनेत पती आणि पत्नी दोघांचाही होरपळून मृत्यू झाला आहे. (Husband wife set on fire himself after an argument over minor dispute in Bhandara) पती-पत्नीने एकमेकांना घेतलं पेटवून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भंडारा शहराला लागून असलेल्या कारधा गावात ही घटना घडली आहे. या गावातील पती आणि पत्नीचं शुल्लक कारणावरुन भांडण झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की, पती महेंद्र सिंगाडे यांनी स्वतःवर आणि पत्नीवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. वाचा : बिर्याणीवरुन पुण्यात राडा; टिक्का भाजण्याच्या सळईने दुकानदारावर हल्ला, धक्कादायक VIDEO चिमुकल्यासमोर कडाक्याचं भांडण मृतकांमध्ये महेंद्र सिंगाडे वय 38 वर्ष, मेघा सिंगाडे वय 30 वर्ष, यांचा समावेश आहे. पती महेंद्र आणि पत्नी मेघा यांचं शुल्लक कारणावरुन भांडण झालं होतं. घरात तीन वर्षांचा चिमुकला असताना त्याच्या समोरच दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. यानंतर दोघांनीही एकमेकांवर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. सुदैवाने या घटनेत तीन वर्षांचा मुलगा बचावला आहे. या घटनेनंतर याची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आणि त्यांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. पती आणि पत्नी यांच्यात वाद नेमक्या कुठल्या विषयावरुन झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. वाचा : 70 वर्षीय शेतकऱ्याचा शिरच्छेद करत मुंडकं केलं गायब, बीडला हादरवणारी घटना दागिन्यांपुढे माणुसकी हरली; रत्नागिरीत तीन वृद्ध महिलांचा खून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली याठिकाणी दोन दिवसांपूर्वी माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन महिलांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधम आरोपींनी क्रूरतेच्या परिसीमा गाठत तिन्ही वृद्ध महिलांना भयंकर मृत्यू दिला होता. यानंतर आरोपींनी संबंधित वृद्ध महिलांचा मृतदेह जाळला होता. या हत्या मृत महिलांच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Crime

    पुढील बातम्या