• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • पती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ!

पती मुलांसोबत बाहेर गेला, घरी पत्नीचा निर्घृण खून, मित्र दिसला घराजवळ!

अनेक ठिकाणी चाकूने भोसकल्याने शीतल यांचा जागीच मृत्यू झाला.

  • Share this:
धुळे, 26 जुलै : धुळे (dhule) शहरातील जगन्नाथ नगरमध्ये एका महिलेचा निर्घृणपणे खून (murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. मयत महिलेचा पती भिकन पाटील यांचा मित्र सोमनाथ कुवर याने हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल भिकन पाटील (sheetal patil) (वय 28, रा.कापडणे, ह.मु.जगन्नाथ नगर, वाडीभोकर रोड धुळे) या महिलेचा सोमवारी दुपारी खून झाला. तिचा पती भिकन पाटील आपल्या मुलांसमवेत बाहेर गेलेला होता. भिकन पाटील हा घरी आल्यानंतर तो पत्नीच्या खोलीत गेला असता त्याला शीतल रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली दिसली. शीतलच्या मानेवर धारदार शस्त्राने अनेक वार केल्याचे  दिसत होते. दरम्यान, भिकनचा मित्र सोमनाथ कौर हा काही वेळाआधीच घरातून बाहेर पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यामुळे हा खून कौर यानेच केला असल्याचा संशय बळावला. नेहरूंच्या 'शांतीदूत' प्रतिमेमुळे देश कमकुवत झाला, राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य मारेकऱ्याने शीतल यांच्यावरती धारदार शस्त्राने वार करत, त्यांना गंभीर जखमी केले. अनेक ठिकाणी चाकूने भोसकल्याने शीतल यांचा जागीच मृत्यू झाला. दोन मुलं व पत्नीसह राहण्यासाठी भिकनने नुकतच भाड्याने घर घेतलं होतं. कुरकुरे तसेच पॉपकॉन विक्रीकरून भिकन व्यवसाय करायचा. दरम्यान, या खूनामागचे नेमके कारण काय? हे अद्याप समोर येऊ शकले नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात खडबड उडाली आहे. पोलीस संशयित सोमनाथचा शोध घेत आहेत. तसंच घराजवळील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातही कौर हा घरातून बाहेर पळतानाचे चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहे. कौरचा शोध घेतला असता तो त्याच्या कापडणे गावातील घरीही नसून त्याचा मोबाईलही बंद येत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.

रिलायन्स फाउंडेशनकडून 10 लाख कर्मचाऱ्यांचं लसीकरण

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी भिकन पाटील याच्याकडून कौर विषयी माहिती जाणून घेतली. या प्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by:sachin Salve
First published: