मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं औक्षण करत केलं स्वागत, म्हणाले, 'ती घरची लक्ष्मी'!

कोरोनावर मात करून परतली पत्नी, पतीनं औक्षण करत केलं स्वागत, म्हणाले, 'ती घरची लक्ष्मी'!

पत्नीला कोरोनाची लागण झाल्यापासून ते तणावात होते, पण पत्नी यातून सुखरुर बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्नीची आरती ओवाळत स्वागत केल्या. या सेलिब्रेशनची परिसरात चांगलीच चर्चा सुरुय.

  • Published by:  News18 Desk

इम्तियाज अली, प्रतिनिधी

जळगाव, 26 एप्रिल : सध्या काळात प्रत्येकालाच सर्वाधिक आनंद कधी होत असेल तर तो आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीनं कोरोनावर मात केल्यानंतर. जळगावमध्ये अशाच एका आनंदाच्या क्षणी पतीनं स्वतः कोरोनावर मात करून घरी परतलेल्या (wife returned home) पत्नीची आरती करत तिचं स्वागत केल्याचं (husband welcomed wife) पाहायला मिळालं. पत्नीला कोरोनाची लागण झाल्यापासून ते तणावात होते, पण पत्नी यातून सुखरुर बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वतः पत्नीची आरती ओवाळत स्वागत केल्या. या सेलिब्रेशनची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी रोड परिसरात नरेश बागडे हे कुटुंबासह राहतात. गेल्या पंधरा दिवसांपासून बागडे हे प्रचंड तणावात होते. त्याचं कारण म्हणजे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोरोनानं गाठलं होतं. बागडे यांना किरकोळ लक्षणं होती त्यामुळं त्यांनी घरीच उपचार घेत कोरोनावर मात केली. मात्र त्यांच्या पत्नी राधिका यांचा त्रास अधिक वाढला होता. त्यामुळं त्यांना शहरातील इक्रा युनानी मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

(वाचा-कोरोनाबाधित आईला मुलानं घराबाहेर काढलं; मुलीनंही हकललं, रस्त्यावरच मृत्यू)

पत्नीला उपचारासाठी दाखल केल्यापासून बागडे आणि त्यांचे कुटुंबीय तणावात होते. रोजच्या परिस्थितीची माहिती घेऊन ते लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करत होते. गेल्या चार दिवसांत त्यांचा तणाव काहीसा कमी झाला कारण राधिका यांची प्रकृती सुधारली होती. त्यानंतर त्यांना सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पण याचा राधिका यांना जेवढा आनंद झाला नसेल त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद नरेश बागडे यांना झाला होता. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पत्नीचं औक्षण करून आणि आरती ओवळून घरी स्वागत केलं.

(वाचा-EC च्या अधिकाऱ्यांवर हत्येचे खटले दाखल करायला पाहिजे; मद्रास हायकोर्टाचा संताप)

एरव्ही कोणत्याही शुभप्रसंगी पत्नी ही पतीचं औक्षण करून स्वागत करत असते. पण याठिकाणी पतीनं पत्नीचं स्वागत केल्याचं अनोखं सेलिब्रेशन पाहायला मिळाल्यानं परिसरात याची चर्चा होती. पण पत्नी ही घरची लक्ष्मी असते आणि ती बरी होऊन परत आल्याचा आनंद असल्यानं लक्ष्मीचं औक्षण केल्याचं सांगत बागडे यांनी आनंद व्यक्त केला.

First published:

Tags: Coronavirus, Jalgaon