मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वनरक्षक पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक पतीची हत्या, मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकला

वनरक्षक पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने प्राध्यापक पतीची हत्या, मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन फेकला

वनरक्षक असलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.  हत्येनंतर आरोपी पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा मृतदेह दूरवर फेकून दिला.

  • Published by:  Pravin Wakchoure
अमरावती, 8 अकोला : पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्या प्राध्यापक पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यास समोर आला आहे. पत्नी आणि तिचा प्रियकर दोघेहे वनखात्यात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. हत्येनंतर आरोपी पत्नीने प्रियकराच्या साथीने पतीचा मृतदेह दूरवर फेकून दिला. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळमधील उमरखेड येथे राहत असलेले प्रा. सचिन देशमुख आपल्या पत्नी धनश्रीला भेटण्यासाठी अकोल्यातील अकोट येथे आले होते. धनश्री येथेच वनरक्षक म्हणून कार्यरत होती. सचिन आणि धनश्री ज्याठिकाणी भेटले होते तेथेच काही वेळाने तिथे तिचा प्रियकर वनरक्षक शिवम पोहोचला. मात्र येथे सचिन आणि शिवमध्ये दोरदार भांडण झालं. यावेळी शिवमने सचिनचा गळा दाबल्याने तो बेशुद्ध पडला. यानंतर कारमध्ये बसवून शिवमने सचिनचा ओढणीने गळा आवळून खून केला. 'इतर पुढाऱ्यांची भूमिका संशयास्पद', शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज? मविआमध्ये नवा 'सामना'
 कुणालाही संशय येऊ नये म्हणून दोघांनीही सचिनचा मृतदेह यवतमाळ येथील दिग्रस येथे नेऊन फेकला. यानंतर दुसऱ्या दिवशी धनश्रीने सासरी फोन करुन सचिन घरी पोहोचला का अशी विचारणा केली. मात्र सचिनचा काही पत्ता लागत नसल्याने घरच्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली. तक्रारीवरुन पोलिसांनी तपास सुरु केला. त्याच दिवशी सचिनचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीस चौकशीत सगळा प्रकार उघडकीस आला. धनश्री आणि सचिनचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर शेवटच्या क्षणी दोघेही एकत्र असल्याचं समोर आलं आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी धनश्रीला अटक केली. तिचा प्रियकर शिवम चिखलदरा येथील एका रिसॉर्टवर लपून बसला होता. पोलिसांनी त्याचाही शोध घेऊन त्याला अटक केली. दोघांनी न्यायालयाने आता 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime, Murder

पुढील बातम्या