साता जन्माच्या गाठी अर्ध्यावरच सुटल्या, पत्नीच्या खूनानंतर पतीने...!

साता जन्माच्या गाठी अर्ध्यावरच सुटल्या, पत्नीच्या खूनानंतर पतीने...!

पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 04 नोव्हेंबर : शुल्लक कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला आणि त्यातून हत्येसारखा मोठा गुन्हा झाल्याची अनेक प्रकरणं समोर आला आहेत. औरंगाबादमध्येही हत्येचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत:देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादच्या औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात ही घटना घडली आहे. आज सकाळी हत्येचा प्रकार उघडकीस आला. रेखा अण्णा गायके असं हत्या झालेल्या 21 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती अण्णा याने फिनाईल पिऊन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरोपी पतीला सध्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात  असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अण्णा याने पत्नीची हत्या केली असल्याची माहिती शेजाऱ्यांना समजताच त्यांनी पोलिसांनी याबद्दल कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, अण्णाने पत्नीची हत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल पोलीस अधिक माहिती मिळवत आहे.

अण्णा आणि त्याच्या पत्नीमध्ये काय वाद झाला याबद्दल पोलीस अण्णाची चौकशी करत आहेत. तर अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण तरुण विवाहितेची अशा प्रकारे हत्या झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime news
First Published: Nov 4, 2019 03:59 PM IST

ताज्या बातम्या