मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

घटस्फोट न देणाऱ्या पत्नीला झाली कोरोनाची बाधा; आयती संधी साधत पतीनं उगवला सूड

घटस्फोट न देणाऱ्या पत्नीला झाली कोरोनाची बाधा; आयती संधी साधत पतीनं उगवला सूड

Crime in Solapur: पत्नीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची संधी साधत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नरक यातना दिल्यानं पत्नीचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

सोलापूर, 30 जुलै: पत्नीला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची संधी साधत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेला वेळेवर उपचार मिळू नयेत म्हणून आरोपीनं नको तो उपद्वव्याप केला आहे. आरोपीनं कोरोनाची बाधा झाल्यानंतर बरेच दिवस पीडितेला उपचारापासून वंचित ठेवल्यानं पीडितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लिंगराज दामू पवार असं आरोपी पतीचं नाव असून तो मंगळवेढा येथील तुकाई नगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपी पवार सध्या कर्नाटकच्या वैद्यकीय खात्यात नोकरीला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2005 साली आरोपी लिंगराज याचं मृत अश्विनी यांच्यांशी विवाह झाला होता. लग्नानंतर अश्विनी यांनी एका मुलीला जन्म दिला होता. मुलगा न झाल्यानं आरोपी पीडितेवर नाराज झाला होता. यामुळे त्यानं पीडितेकडे घटस्फोटाची मागणी केली होती.

हेही वाचा-पत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत

पण पत्नी अश्विनी यांनी घटस्फोट द्यायला नकार दिला. दरम्यान एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अश्विनी यांना कोरोना विषाणूची लागण झाली. पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा, म्हणून आरोपीनं अश्विनी यांना वेळेवर उपचारासाठी दाखल केलं नाही. सासू सासरे आणि नातेवाईकांनी तगादा लावल्यानंतर आरोपीनं पीडितेला उपचारासाठी मंगळवेढा याठिकाणी दाखल केलं. पण येथील डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचं सांगत सोलापूरला जाण्याचा सल्ला दिला. पण आरोपीनं पीडितेला सोलापूरला नेण्यास टाळाटाळ केली.

हेही वाचा-मुंबईत डिलिव्हरी बॉयला शिवसैनिकांची बेदम मारहाण, चौघांना अटक

कोरोनाची बाधा झाल्यानंतर, खूप दिवसांनी आरोपीनं पीडितेला विजापूर याठिकाणी उपचारासाठी नेलं. पण इकडे उपचारासाठी जात असताना आरोपीनं वाटेत मुद्दाम चार तास गाडी उभी करून ठेवली. चार तास विलंबानं विजापूरला उपचारासाठी नेलं पण याठिकाणीही अश्विनी यांना दाखल करून घेण्यात आलं नाही. येथील डॉक्टरांनी पीडितेला बेळगावला घेऊन जाण्यास सांगितलं.

हेही वाचा-लग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण

पण पीडित महिलेचा कोरोनामुळे मृत्यू व्हावा म्हणून आरोपीनं तिला बरेच दिवस बेळगावला नेलं नाही. पत्नी शेवटच्या घटका मोजत असताना आरोपीनं नातेवाईकांच्या दबावापोटी तिला बेळगाव याठिकाणी उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याठिकाणी उपचार सुरू असताना अश्विनी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी मृत अश्विनी यांच्या नातेवाईकांनी आरोपी लिंगराज पवार याच्याविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Solapur