सात जन्माची गाठ 5 महिन्यात सुटली, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने साडीने घेतला गळफास!

सात जन्माची गाठ 5 महिन्यात सुटली, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने साडीने घेतला गळफास!

पत्नी नांदायला येत नाहीत म्हणून नैराश्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

बीड, 10 नोव्हेंबर : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने निराशेच्या भरात गळफास घेवून स्वतःला संपवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केज शहरातील भवानी नगर भागात हा प्रकार उघडकीस आला. लक्ष्मण केशव शिंदे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. केशव यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रेम प्रकरण आणि लग्नानंतरच्या वादातून गुन्हा घडल्याचा किंवा आत्महत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. पण पत्नी नांदायला येत नाहीत म्हणून नैराश्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. लग्नाला पाचच महिने होऊनही पत्नीला तिचे नातेवाईक माहेरी घेऊन गेले. तिला परत पाठवायला त्यांनी नकार दिला. तीन महिन्यांपासून वारंवार पत्नीला परत आणण्यासाठी केशव हे सासरी जात होते. मात्र, मुलीच्या वडिलांनी पाठवण्यास नकार दिला.

मोठी बातमी - राजकारणात भुकंप: भाजपला सगळ्यात मोठा धक्का, काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा

लक्ष्मणचे डोके दुखत असल्याने पत्नीच्या नातेवाइकांनी ' अगोदर लक्ष्मणचा उपचार करा. त्यानंतर आम्ही मुलीला नांदायला पाठवितो असा निरोप दिला होता. या प्रकारातून नैराश्य आल्याने लक्ष्मण यांनी घरी कोणी नसताना आतून दरवाजा लावून घेत घरातील लोखंडी खांबाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मात्र, मुलीच्या नातेवाईकांच्या हट्टापाई नैराश्याने ग्रासलेल्या लक्ष्मण यांनी शेवटी स्वतःला संपवून घेतले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: suicide
First Published: Nov 10, 2019 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading