शरीराची होळी अन् संसाराची राखरांगोळी, पत्नीच्या या हट्टामुळे पतीने स्वत:ला पेटवलं

शरीराची होळी अन् संसाराची राखरांगोळी, पत्नीच्या या हट्टामुळे पतीने स्वत:ला पेटवलं

या प्रकरणामुळे पती-पत्नीच्या नाजूक नातेसंबंधातील कटूता जीव घेणी ठरू शकते ? यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 19 मार्च : ऐन होळीत संसाराची राख-रांगोळी झाल्याचा एक धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. पती-पत्नीच्या किरकोळ भांडणातून माहेरी निघून आलेली बायको सोबत येण्यास तयार नसल्याने चिडलेल्या पतीने रागाच्या भरात सासरच्या घरासमोर स्वतःवर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या केली आहे.

गेवराई तालुक्यातील तलवाडा फाटा इथे जावयाने पेटवून घेतलं. गंभीर भाजलेल्या अवस्थेत तरुणाला जिल्हा रुग्णयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : देवासारखे धावून आले डॉक्टर, 6 महिन्याच्या चिमुकल्याच्या गळ्यातून काढली विक्सची डबी

चंद्रकांत लक्ष्मण गवळी (वय २३, रा. पांढरवाडी, ता. गेवराई)असं मृत जावयाचं नाव आहे. तलवाडा फाट्याजवळ एका ट्रॅक्टरच्या शोरूमसमोर त्याच्या सासऱ्याचं घर आहे. किरकोळ कारणांमुळे झालेल्या पती-पत्नीच्या भांडणांमुळे चंद्रकांतची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी निघून गेली होती.

तिला परत घेवून जाण्यासाठी चंद्रकांतने सासरवाडीत येत पत्नीला सोबत येण्यासाठी आग्रह धरला. परंतु, पत्नीने घरी परत न येण्याचा हट्ट धरला आणि चंद्रकांतला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या चंद्रकांतने सोबत आणलेली पेट्रोलची बाटली स्वतःवर ओतून पेटवून घेतलं.

या घटनेत चंद्रकांत ६८ टक्के भाजला होता. सासुरवाडीच्या लोकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. गंभीर अवस्थेत त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गेवराई पोलिसांत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस शिंदे करत आहेत. मात्र या प्रकरणामुळे पती-पत्नीच्या नाजूक नातेसंबंधातील कटूता जीव घेणी ठरू शकते ? यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

CCTV VIDEO: भर दिवसा तरुणीला रॉकेल ओतून पेटवलं, त्याआधी चाकून केले वार

 

First published: March 19, 2019, 8:27 PM IST

ताज्या बातम्या