दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर श्याम भंडारी याने घराला आग लावणार आहे, अशी धमकीच दिली होती. सोमवारी रात्री सुद्धा त्याने घराला आग लावणार आहे, अग्निशमन दलाला बोलावून घ्या, असं शेजाऱ्यांना सांगितलं होतं. मागील तीन दिवसांपासून तो वारंवार शेजाऱ्यांना सांगत होता. त्यामुळे शेजारी सुद्धा चिंतेत सापडले होते. (Google वर हे तीन शब्द लिहा, लगेच समजेल तुमचा Internet Speed; सोपी-सिक्योर पद्धत) आज सकाळी पती आणि मुलं माहेर निघून गेली. त्यानंतर श्याम भंडारी याने घराला आग लावून बाहेर निघून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारून आग नियंत्रणात आणली. (आधी अपहरणाचा प्रयत्न, मग भररस्त्यात..; पाकिस्तानात 18 वर्षीय हिंदू तरुणीची हत्या) पण, त्याच्या या कृत्यामुळे स्वत:च्या घराचे नुकसान तर केले पण शेजारील घराचेही मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. सुदैवाने घरात पत्नी आणि मुले नसल्याने जीवितहानी टळली. दरम्यान, आग लावणाऱ्या श्याम भंडारीविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.#सोलापूर : पत्नीसोबत झालेल्या वादातून व्यक्तीने स्वतःचे राहते घर पेटवले pic.twitter.com/twOHUcTa2i
— News18Lokmat (@News18lokmat) March 22, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.