• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बायकोशी भांडणात नवऱ्याने घराला लावली आग, सिलेंडर टाकीचा झाला स्फोट अन्...

बायकोशी भांडणात नवऱ्याने घराला लावली आग, सिलेंडर टाकीचा झाला स्फोट अन्...

रोजचं मडं त्याला कोण रडं याप्रमाणे शेजारच्या लोकांनी या नवरा-बायकोच्या भांडणात कडे दुर्लक्ष केलं. पण, कालचे भांडण विकोपाला पोहोचलं

  • Share this:
सातारा, 19 ऑक्टोबर : सुखी संसारात एकदा का संशयाची पाल नवऱ्याच्या मनात चुकचुकली की ती मरेपर्यंत डोक्यातून जात नाही आणि यातून अनेकांचे संसार मातीमोल होतात. याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे, सातारा (satara) जिल्ह्यातील माजगाव या गावात नवऱ्याने घराला आग लावून दिली. यात शेजाऱ्यांचीही घरं जळाली. संजय पाटील असं या संशयखोर नवऱ्याचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव हे छोटसं गाव ह्याच गावातला हा संजय पाटील. यांनेच आपल्या संसाराला बरोबर इतरांच्या दहा संसाराची राखरांगोळी केली. त्याला कारण ठरलं हे या नवरोबाच्या मनात असलेलं आपल्या पत्नी बाबतच संशयाचं भूत. पत्नी पल्लवीचे गावातील लोकांबरोबर अनैतिक संबंध असल्याचे संशय संजय पाटील यांच्या मनात घोंगावत होते. 'मिसेस मुख्यमंत्री' आता पौराणिक भूमिकेत; तुम्ही पाहिला का हा VIDEO? रोजचं मडं त्याला कोण रडं याप्रमाणे शेजारच्या लोकांनी या नवरा-बायकोच्या भांडणात कडे दुर्लक्ष केलं. पण, कालचे भांडण झालं मात्र ते विकोपाला पोहोचलं. पल्लवीने  नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठलं आणि नवऱ्याची तक्रार केली. मग काय संजयने आपल्या घरातील एका वस्तूला पेटवायला सुरुवात केली आणि बघता बघता घर पेटलं. शेजारच्या माणसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र हा पठ्याने त्यांच्याच अंगावर कोयता आणि कुऱ्हाड घेऊन जाऊ लागला. लोकांनी संजयला बाहेर ओढून काढलं आणि चांगला चोप दिला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. संजयने आगीत टाकलेल्या गॅसच्या टाकीचा स्फोट झाला आणि शेजारच्या घरांना देखील आग लागली आणि 10 घरातला सगळा संसार जळून खाक झाला. लाखोंचं नुकसान झालं. Bigg Boss 15 मध्ये असं काय झालं ज्यामुळे विशालने अफसानाच्या झिंज्या धरून फरफटलं आता या लोकांकडे जाळलेली घरं, पडक्या भिंती आणि राख पाहून डोळ्यात आसू आणून बसण्यापलीकडे कोणता मार्ग राहिला नाही. आग लावून 10 संसाराची राखरांगोळी करणाऱ्या संजय पाटीलला पोलिसांनी अटक केली असून मल्हार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. संशयामुळे संसाराचा कणा मोडून पडतो मात्र संजयच्या डोक्यातील संशयाच्या आगीमुळे 10 संसाराचा कणा मोडून पडला आहे.
Published by:sachin Salve
First published: