Home /News /maharashtra /

Wife abuse : दोन मुली झाल्यावर पठ्ठ्या म्हणाला, मला लग्न मंजूर नाही कारण..

Wife abuse : दोन मुली झाल्यावर पठ्ठ्या म्हणाला, मला लग्न मंजूर नाही कारण..

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

लग्न (Marriage) झाल्यावर पाठोपाठ या दाम्पत्याला दोन मुली झाल्या तेव्हा मला लग्न मंजूर नव्हते, असे पतीने (Husband) म्हटले आहे. तसेच दोन मुली झाल्या म्हणून पत्नीचा छळ सुरू केला होता.

  सातारा, 22 मे : मुलगा किंवा मुलगी पसंत नसल्याने अनेकदा लग्न (Marriage) जुळत नसल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. इतकेच नव्हे तर लग्नानंतर मुलगी झाल्याने त्या मुलीच्या आईचा छळदेखील सासरच्या लोकांनी केल्याचे तुम्ही वाचले असेल. लग्नानंतरही हुंड्याची मागणी (Dowry Demand) करत लग्न मोडल्याचे (Marriage Broke up) उदाहरणंही तुम्ही पाहिले असतील. मात्र, आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन मुली झाल्यावर म्हणाला.. लग्न केल्यावर लग्न मंजूर नाही, असे एकाने म्हटले आहे. लग्न (Marriage) झाल्यावर पाठोपाठ या दाम्पत्याला दोन मुली झाल्या तेव्हा मला लग्न मंजूर नव्हते, असे पतीने (Husband) म्हटले आहे. तसेच दोन मुली झाल्या म्हणून पत्नीचा छळ सुरू केला. अखेर या प्रकाराला कंटाळून या विवाहित महिलेने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पतीसोबत सासू-सासरे यांच्यावर छळ करत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली राहुल शिंदे असे पीडितेचे नाव आहे. ती सध्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कोळकी येथे राहते. पीडित सोनालीने दिलेल्या तक्रारीनंतर तिचा पती राहुल शिवाजी शिंदे, सासरे शिवाजी शिंदे आणि सासू शालन शिंदे (सर्व रा. कर्मवीरनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेचा केला छळ सोनाली आणि राहुलचे लग्न झाल्यावर या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. मात्र, यानंतर लग्नामध्ये सोने कमी घातले आहे. तु मला पसंत नव्हतीस. तु मला सोडचिठ्ठी दे. मला हे लग्न अजिबात मंजूर नव्हते, असं म्हणत पतीने सोनालीचा छळ सुरू केला होता. इतकेच नव्हे तर दुसरीही मुलगीच झाल्याने तिच्यावर संशयही घेतला होता. तसेच प्रसुतीसाठी माहेरहून 90 हजार रुपयांचा खर्च आण, अशी मागणीही त्याने केली होती. हेही वाचा - सासऱ्यावर जडलं प्रेम, दोन मुलांना टाकून फरार; निराश झालेल्या पतीनं उचललं टोकाचं पाऊल पत्नीकडे केली आणखी एक मागणी
  यावरुन सोनालीचा छळ सुरू होता. दिवसेंदिवस तिला तिच्या पतीकडून काहीना काही ऐकावे लागत होते. एक दिवशी तर पतीने शेजारच्या एका माणसाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नांदवतो, असे म्हणत सोनालीला मारहाण केली, असेही तिने फिर्यादीत म्हटले आहे. सोनालीने या छळाला कंटाळून सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पती राहुल शिवाजी शिंदे, सासरे शिवाजी शिंदे आणि सासू शालन शिंदे (सर्व रा. कर्मवीरनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Crime news, Satara news, Wife and husband

  पुढील बातम्या