Home /News /maharashtra /

Beed News कोरोनामुळे पत्नीने घेतला जगातून निरोप, पतीने रुग्णालयातून पळवला मृतदेह!

Beed News कोरोनामुळे पत्नीने घेतला जगातून निरोप, पतीने रुग्णालयातून पळवला मृतदेह!

कुटुंबीय मृतदेह मिळण्यासाठी वाद घालत होते. काही वेळानं डॉक्टर व नर्सेसची नजर चुकवून महिलेचा पती रुस्तुम सुरवसे यांनी नातेवाईकांच्या मदतीनं मयत पत्नीचा मृतदेह गाडीत टाकून पळवून नेला.

    बीड, 17 मे: कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झालेल्या रुग्णांवर कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार (Covid Protocol last rites) केले जातात. कोरोनाचा संसर्ग (Avoid corona infection) टाळण्यासाटी रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात (Dead body) मृतदेह दिला जात नाही. रुग्णालय आणि स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यविधी करतात. कुटुंबातील मोजक्या लोकांना पीपीई किटमध्ये उपस्थित राहू दिलं जात. पण बीडमध्ये (Beed) पतीनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेहच पळवून नेला आहे. (वाचा-कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण) बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टर आणि नर्सच्या तक्रारी वरून या प्रकरणी पती आणि  नातेवाईकांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीनं मृतदेह पळवून नेल्याची बीड जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे. गेवराई तालुक्यातील कुंभारवाडीमधील सुरवसे कुटुंबातील महिलेला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर बीडमधील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. (वाचा-एका खोलीचं घर, गावातही जागा मिळेना; अकरा दिवस झाडावरच राहिला कोरोना रुग्ण) रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास या महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी अंत्यविधीसाठी मृतदेह देण्याची मागणी केली. मात्र डॉक्टरांनी आणि नर्सने कोरोनाचा रुग्ण असल्यामुळं मृतदेह अंत्यविधीसाठी देता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितलं. मात्र कुटुंबीय मृतदेह मिळण्यासाठी वाद घालत होते. काही वेळानं डॉक्टर व नर्सेसची नजर चुकवून महिलेचा पती रुस्तुम सुरवसे यांनी नातेवाईकांच्या मदतीनं मयत पत्नीचा मृतदेह गाडीत टाकून पळवून नेला. या प्रकारानंतर नर्स अर्चना पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कुठलीही काळजी न घेता वैद्यकीय तपासणी न करता मृतदेह कुटुंबीया गावाकडे घेऊन गेले असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांचे मृतदेह नातेवाईकांकडे न देण्याचं सर्वात मोठं कारण हे त्यामुळं कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो, हे आहे. घरी कोविडचा प्रोटोकॉल पाळून अंत्यसंस्कार करणं अशक्य आहे. त्यामुळं प्रशासनच अंत्यसंस्काराची सोय करते. मात्र तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे अशी कृत्य करत असल्यानं इतरांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beed news, Coronavirus

    पुढील बातम्या