Home /News /maharashtra /

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पोलिसांना सांगितलं पत्नीचा मृत्यू झाला पण खरं कारण...

पती आणि पत्नीच्या नात्यात संशय निर्माण झाला तर हे अतूट नातं कोणतं वळण घेईल याची कल्पना सुद्धा करता येत नाही.

अमरावती, 16 मे : पती आणि पत्नीचं नातं विश्वासावर अवलंबून असतं. या नात्यात संशय निर्माण झाला तर हे अतूट नातं कोणतं वळण घेईल याची कल्पना सुद्धा करता येत नाही. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सावनेर येथे घडला आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. नांदगावखंडेश्वर तालुक्यातील सावनेर इथं राहणारे देवानंद बुराडे  आणि संगीता बुराडे यांचा सुखी संसार सुरू होता. या दाम्पत्याला नऊ आणि सहा वर्षांची दोन मुलं आहे. देवानंद हा गावाजवळील एका पोल्ट्री फार्मवर मजुरी करतो. सुखी सुरू असलेल्या त्यांच्या संसाराला अचानक भयंकर वळण आले. देवानंद याच्या डोक्यात संशयाचे भुताने घर केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून देवानंद आणि त्याच्या पत्नीमध्ये खटके उडत होते. हेही वाचा -महापुरानंतर कोरोनाचं मोठ संकट! रेडझोनमधून येणार्‍यांना कोल्हापूरात NO ENTRY? दोन दिवसांपूर्वी देवानंद व पत्नी संगीता यांच्या वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. रागाच्या भरात देवानंद याने पत्नीचा गळा दाबून खून केला. रागाच्या भरात आपल्या हातून काय घडले याची जाणीव झाल्यावर देवानंद भानावर आला. त्यानंतर त्याने रात्रभर पत्नीचा मृतदेह घरातच ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घरात पत्नी मृतअवस्थेत आढळून आली, अशी तक्रार  नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असता सुरुवातील देवानंद आणि त्याच्या शेजारील नातेवाईकांनी कमालीचे मौन बाळगले होते. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी देवानंद याची कसून चौकशी केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच देवानंद याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. देवानंद याने पत्नी संगीता बुराडे हीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचं पोलिसांना सांगितलं. हेही वाचा -चॉकलेट खाण्याच्या प्लॅनमुळे मित्र गमावला, मुंबईतील अपघातात धक्कादायक खुलासा तसंच, गेल्या काही दिवसांपासून पत्नीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता, त्यातून हे कृत्य केलं असंही त्याने सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ज्या दोरीने संगीताचा गळा आवळून खून केला होता ती जप्त केली आहे.  पोलिसांनी आरोपीस देवानंद याला तात्काळ अटक करून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या