साक्रीत खून.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने घातला पत्नीच्या डोक्यात दगड

चारित्र्याच्या संशयाने पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यात घडली आहे. भारती चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी गोरख चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2019 05:12 PM IST

साक्रीत खून.. चारित्र्याच्या संशयावरून पतीने घातला पत्नीच्या डोक्यात दगड

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 21 जून- चारित्र्याच्या संशयाने पतीनेच पत्नीच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना साक्री तालुक्यात घडली आहे. भारती चव्हाण असे मृत महिलेचे नाव आहे. आरोपी गोरख चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे.

भारती हिचा 14 वर्षांपूर्वी गोरख चव्हाण याच्याशी विवाह झाला होता. मात्र, बेरोजगार असलेला गोरख नेहमीच दारू पिऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. भारतीला मारहाणही करत होता. नेहमीच चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व्यसनी नवऱ्याला कंटाळून भारती आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून आली होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती माहेरी राहत होती. दरम्यान, भारती माहेरी अंगणात कपडे धूत असताना चारित्र्याच्या संशयाने पछाडलेला गोरख अचानक तिथे आला. 'तुला आता मारूनच टाकतो, म्हणत गोरखने हातातला मोठा दगड भारतीच्या डोक्यात टाकला. यात भारतीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर गोराखने पळ काढला होता.

दरम्यान, खून प्रकरणी भारती चव्हाण हिच्या कुटुंबियांच्या फिर्यादीवरून गोरख चव्हाण याच्या विरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी गोरख चव्हाण याला अटक केली आहे.

अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची भिवंडीत निर्घृण हत्या

Loading...

दुसऱ्या घटनेत अत्याचाराला विरोध करणाऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी तरूणाला तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 23 वर्षीय पीडित महिला भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका चाळीत राहात होती. ती घरात एकटी असताना संधी साधून आरोपी निखील संजय कडू ( वय-20) या तरुणाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने अत्याचाराला प्रतिकार केला असता त्याने रागाच्या भरात धारदार चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्येप्रकरणी नारपोली पोलिसांनी अवघ्या 10 तासांत निखील कडू आरोपीला अटक केली आहे.

'पोलीस आझाद मैदान स्वत: च्या बापाचं समजतात का?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2019 05:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...