धक्कादायक : देवीच्या दर्शनाला आणलं आणि बायकोला दरीत ढकलून दिलं

नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. सप्तश्रुंगीच्या डोंगरावरून नवऱ्याने आपल्या बायकोला ढकलून दिलं. एवढंच नाही तर जेव्हा ती डोंगरावरून खाली पडत होती तेव्हा हा नराधम तिचे मोबाइलमध्ये फोटो काढत होता. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2019 09:49 PM IST

धक्कादायक : देवीच्या दर्शनाला आणलं आणि बायकोला दरीत ढकलून दिलं

नाशिक, 16 जुलै : नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. सप्तश्रुंगीच्या डोंगरावरून नवऱ्याने आपल्या बायकोला ढकलून दिलं. एवढंच नाही तर जेव्हा ती डोंगरावरून खाली पडत होती तेव्हा हा नराधम तिचे मोबाइलमध्ये फोटो काढत होता. पोलिसांनी आता त्याला अटक केली आहे.

बाबूलाल काडे आणि त्याची पत्नी कविता हे रविवारी नांदुरीच्या डोंगरावर गेले होते. तिथे त्याने आपल्या बायकोला दरीत ढकलून दिलं. बाबुलाल काडे हा 30 वर्षांचा आहे आणि त्याची पत्नी कविता 22 वर्षांची होती. हे दोघं मध्य प्रदेशमधले आहेत. वणीला नांदुरीच्या डोंगरावर सप्तश्रुंगी देवीचं मंदिर आहे. इथे हे दोघंजण दर्शनाला गेले होते. त्यावेळी बाबूलाल हा कविताला दरीत ढकलून देत असताना बाकीच्या भाविकांनी पाहिलं आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

( वाचा : Whatsapp वापरणं मानसिक आरोग्यासाठी चांगलं की वाईट? )

कविताला ढकलून दिल्यामुळे ती खोल दरीत कोसळली. दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बाबूलालने कविताचा अशा पद्धतीने खून का केला या कारणांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहानगीचा मृत्यू

Loading...

दरम्यान, नाशिक शहरात एका 14 महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूनेही खळबळ उडालीय. हा मृत्यू नाही तर घातपात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज नावाच्या अपार्टमेंटमधील मुकेश पवार कुटुंबीयांची ही मुलगी होती. हा मृत्यू नाही तर घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बालिकेला जखमी अवस्थेत तिच्या कुटुंबीयांनी पंचवटीतील निमाणी परिसरातील येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केल्याचं पोलिसांनी सांगितले. घरात असलेली मुलीची आईसुद्धा जखमी असल्याची माहिती आहे. मुलीचे वडील कामावर गेले होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आई परस्परविरोधी माहिती देत असल्याने संशय बळावला असून आईच्या हातावरच्या खुना या किरकोळ असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे नेमकं काय झालं याचा पोलीस तपास करत आहेत.

===============================================================================================

इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू, चिमुरड्याला ढिगाऱ्याबाहेर काढतानाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...