Home /News /maharashtra /

कोट्यवधीची शेती पण डोक्यात संशयाचं भूत, पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दिला गाडीखाली जीव!

कोट्यवधीची शेती पण डोक्यात संशयाचं भूत, पत्नीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून दिला गाडीखाली जीव!

नितीन हा पत्नी सुनितावर नेहमी संशय घेत होता. त्यातून अनेक वेळा त्यांच्यात भांडणं देखील झाली

    बब्बू शेख, प्रतिनिधी मनमाड, 28 जानेवारी : म्हटलं जातं की संशयाला कोणतेही औषध नाही. संशयामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे अशीच एक धक्कादायक घटना मनमाडपासून जवळ असलेल्या दहेगाव इथं घडली. चारित्र्यवर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृणपणे खून केल्यानंतर स्वतःला ही वाहनाच्या खाली झोकून आत्महत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतात पडलेला मृतदेह सुनिता कडनोरचा तर रस्त्याच्या कडेला असलेला मृतदेह नितीन कडनोरचा आहे. नितीन हा पत्नी सुनितावर नेहमी संशय घेत होता. त्यातून अनेक वेळा त्यांच्यात भांडणं देखील झाली. प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलं होतं. नातेवाईकांनी समजूत काढल्यामुळे प्रकरण मिटलं आणि दोघांचा संसार पुन्हा सुरू झाला. मात्र, नितीन च्या डोक्यातून संशयाचं भूत काही गेलं नव्हतं. अखेर आज सुनीता स्वतःच्या शेतात इतर महिलांसोबत कांद्याची लागवड करीत असताना नितीनने तिच्यावर हल्ला करून डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. त्यात सुनिताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीला ठार केल्या नंतर  नितीनने गावातून जाणाऱ्या पुणे-इंदूर मार्गावर धाव घेऊन स्वतःला भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाखाली झोकून दिलं त्यात त्याचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवलं. सुनिता आणि नितीनला एक मुलगा, 2 मुली असून नितीन हा आई-वडिलांना एकुलता एक होता. त्याच्याकडे भरपूर बागायत शेती असल्याने एका प्रकारे तो कोट्यधीश मानला जात होता. मात्र, संशयाचं भूत डोक्यात घरं करून राहिल्यामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पत्नीला बेदम मारहाण दरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाच नवरा आणि सासूने सूनला निर्दयतेने मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पती आणि सासूला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने मारहाणीनंतर महिलेच्या शरीरावर झालेल्या जखमांचा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हे प्रकरण  आहे. हिमाचल प्रदेशातील  मंडईतील थलाट येथे राहणाऱ्या खुशबूचे 26 जानेवारी 2019 रोजी पानारसा येथे राहणाऱ्या चिरंजीशी लग्न झाले होते. असा आरोप आहे की, लग्नानंतर सासरच्यांनी खुशबूवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. सासरच्यांनी केलेल्या छळामुळे नाराज खुशबू जेव्हा पोलीस तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा तिथे सासरच्यांनी घरगुती बाब सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या... 26 जानेवारी 2020 रोजी, जेव्हा खुशबू आणि चिरंजी यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, तेव्हा चिरंजी आणि तिची आई इंद्रदेवी यांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. असा आरोप केला जात आहे की, मुलगा आणि आईने खुशबूला बेदम मारहाण केली. आधी तिचं तोंड बांधले गेले आणि नंतर तिच्या तोंडावर पट्ट्याने मारहाण केली. 26  जानेवारीला ही घटना घडल्यानंतर खुशबूने तिच्या आईला जाऊन संपूर्ण परिस्थिती सांगितली. खुशबूच्या अंगावरील जखमांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारही दाखल केली आहे. या प्रकरणाला दुजोरा देताना एसपी (मंडी) गुरदेव शर्मा म्हणाले की, पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती आणि सासू यांना भादंविच्या कलम 498ए आणि 323 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्याने सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Crime, Manmad, Nashik

    पुढील बातम्या