Home /News /maharashtra /

संशयाच्या 'भूताने' संसार केला उद्ध्वस्त, आईचा खून करणाऱ्या बापाला लेकाने पाठवले गजाआड

संशयाच्या 'भूताने' संसार केला उद्ध्वस्त, आईचा खून करणाऱ्या बापाला लेकाने पाठवले गजाआड

गेल्या काही दिवसांपासून नारायण खराबेला आपल्या पत्नीवर संशय येत होता. संशयाच्या बळावर तो...

यवतमाळ, 18 डिसेंबर : संशयाचं भूत जर मानगुटीवर बसलं तर माणूस काय करेल याचा नेम नाही. यवतमाळमध्ये (yavatmal) अशीच घटना समोर आली आहे. आपल्या 38 वर्षीय पत्नीच्या (wife murder) चारित्र्यावर संशय घेऊन या पतीने (husbend) आपल्या पत्नीची हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद (pusad) शहरातील विठाला वार्डात घडली. रेखा नारायण खराबे असं मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपी पतीला अटक केली आहे. पुसद शहरातील विठाला वॉर्डमध्ये आरोपी नारायण खराबे हा आपली मृत पत्नी रेखा आणि मुलासह राहत होता. गेल्या काही दिवसांपासून नारायण खराबेला आपल्या पत्नीवर संशय येत होता. संशयाच्या बळावर तो तिला मारहाण देखील करायचा. शुक्रवारी रात्री सुद्धा दोघांमध्ये याच मुद्यावरून भांडण झालं. रागाच्या आरोपी नारायण याने धारदार शस्त्राने रेखाचा खून केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पहाटे 4 पर्यंत गार्डसोबत गप्पा अन् अचानक स्वदिच्छा गायब, 20 दिवस उलटले पण... घटनेचे माहिती मिळताच  पुसद शहर ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी मुलगा विजय खराबे याच्या तक्रारीवरून नारायण खराबे याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आठ महिन्याच्या गर्भवतीच्या मृतदेहाशेजारी पतीची आत्महत्या की हत्या? दरम्यान, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत व पत्नीही मृतावस्थेत बेडवर आढळून आल्याची धक्कादायक घटना बीड तालुक्यातील वैतागवाडी येथे उघडकीस आली. या घटनेने खळबळ उडाली असून राजेश भालचंद्र जगदाळे (वय २६) व दीपाली राजेश जगदाळे (वय २४) अस मयत  जोडप्याच नाव आहे.दीपाली ही आठ महिण्याची गर्भवती होती. दोघाचं एक वर्षांपूर्वी लग्न झालेले होते. हत्या की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. सदरील प्रकरणाचा नेकनूर पोलिसांनी पंचनामा करून  दोन्ही मृतदेह  येथील स्त्री व कुटीर रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले आहेत. दीपाली ही गरोदर होती व हे शेतकरी कुटुंब होते. अगदी गुण्यागोविंदाने सर्व काय चालू असताना ही घटना अचानक घडल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या