मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पत्नीने मद्य प्राशन केल्यानं पतीची सटकली; कुऱ्हाडीचा घाव घालून दिली आयुष्यभराची शिक्षा

पत्नीने मद्य प्राशन केल्यानं पतीची सटकली; कुऱ्हाडीचा घाव घालून दिली आयुष्यभराची शिक्षा

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Murder in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे याठिकाणी हत्येची एक थरारक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने कुऱ्हाडीने घाव (stabbed with axe) घालून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
चाळीसगाव, 21 मार्च: जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील मेहुणबारे याठिकाणी हत्येची एक थरारक घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने कुऱ्हाडीने घाव (Stabbed with axe) घालून आपल्या पत्नीची निर्घृण हत्या (Wife's brutal murder) केली आहे. संबंधित मृत महिलेनं घटनेच्या दिवशी मद्य प्राशन केलं होतं. पत्नीने दारू प्यायल्याच्या कारणातून संतापलेल्या पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. हा घाव वर्मी लागल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बाजरीच्या शेतात लपून बसलेल्या पतीला पोलिसांनी अटक (husband arrested) केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. नीनूबाई कुवरसिंग पावरा असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती कुवरसिंग चतरसिंग पावरा याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुवरसिंग हा मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी असून वर्षभरापूर्वी तो आपली पत्नी आणि तीन मुलांसह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे याठिकाणी स्थलांतर केलं होतं. याठिकाणी ते ज्ञानेश्वर सोमनाथ माळी यांच्या शेतात सालदार म्हणून काम करत होते. हेही वाचा-ठाण्यात विवाहितेसोबत पतीसह सासऱ्याचं विकृत कृत्य; नग्न फोटो केले व्हायरल दरम्यान, आठ दिवसांपूर्वी होळीनिमित्त कुवरसिंग यांची तिन्ही मुलं आपल्या गावी गेले होते. यावेळी शेतात दोघं पत्नी-पत्नीच राहत होते. घटनेच्या दिवशी 18 मार्च रोजी रात्री कुवरसिंग यांच्या पत्नीने दारू प्यायली होती. दारू पिण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी कुवरसिंग याने संतापच्या भरात मद्य प्राशन केलेल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. यानंतर वाद विकोपाला गेल्यानंतर कुवरसिंग याने कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यात घाव घातला. यामुळे नीनुबाई यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. हेही वाचा-पाषाण टेकडीवर तरुण-तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार, पुणेकरांना सावध करणारी घटना या धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या कुवरसिंग याने गावात धाव घेतली. तसेच शेतीमालक आणि इतर नातलगांना पत्नीला काहीतरी झालं असून ती बोलत नसल्याचा बनाव रचला. घटनेची माहिती मिळताच मेहुणबारे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बाजरीच्या शेतात लपून बसलेल्या पतीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मेहुणबारे पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Jalgaon, Murder

पुढील बातम्या