मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह फेकला पाण्याच्या टाकीत

पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह फेकला पाण्याच्या टाकीत

    नागपूर, ता. 4 सप्टेंबर : नागपुरात पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात भरून तो पाण्याच्या टाकीत फेकल्याची मन हेलावणारी घटना घडली आहे. धरमपेठ भागातील मनपाच्या ट्रॅफिक पार्क मधील सुलभ शौचालयच्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह पोत्यात भरलेल्या आढळल्याने खळबळ उडाली. याच सुलभ शौचालयामध्ये कामगार म्हणून काम करणाऱ्या चंद्रकला यादव यांचा हा मृतदेह असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याच सुलभ शौचालयात काम करणाऱ्या राज यादव याला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. राज आणि चंद्रकला यांच्यात दोन तीन दिवसांपुर्वी वाद झाला आणि त्यातूनचे त्याने हे कृत्य केल्याच प्राथमिक तपासात पुढे आलय. दरम्यान या प्रकरणात आरोप राज याला पोलिसांनी अटक केलीय. या संदर्भात पोलिस आरोपी राज याची चौकशी करत आहे. धरमपेठ भागात हा सर्व प्रकार घडल्याने खळबळ उडालीय.

    धरमपेठ भाग हा नागपूरातला हायप्रोफाईल भाग आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक महत्वांच्या व्यक्तिंची घरं या भागात असल्याने इथं पोलिसांची कायम वर्दळ असते. अशा महत्वाच्या भागात हत्येची घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

    तर ही घटना पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. असं असलं तरी आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिलीय. गेल्या काही महिन्यांपासून नागपूरात हत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. नागपूरात गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसून धाक नसल्यानेच गुन्हेगारांनी डोके वर काढल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय.

    तर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्याचं  प्रमाण वाढलं असून आलेल्या प्रत्येक गुन्ह्यांची नोंद ठेवली जात असल्याने गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय.

     

    VIDEO : दहीहंडीचे बक्षिस वितरण सुरू असताना कोसळला स्टेज

    First published:
    top videos

      Tags: Husband killed wife, Nagpur police, Water tank