Home /News /maharashtra /

घरातच दोघे भिडले, नंतर भाऊजीने हातोड्याच्या एका घावात मेव्हण्याला संपवलं

घरातच दोघे भिडले, नंतर भाऊजीने हातोड्याच्या एका घावात मेव्हण्याला संपवलं

प्रभाकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले.

बदलापूर, 13 फेब्रुवारी : बदलापूर पूर्वेच्या समर्थ नगर भागात इमारतीमधील घरात भाऊजीनेच मेव्हण्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयत प्रभाकर वायाळ याचा भाऊजी अमर विश्वकर्मा याने डोक्यात हातोडा घालून मेव्हणा प्रभाकर याची निर्घृण हत्या केली आहे. समर्थ नगर भागातील शिवनेरी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आरोपी विश्वकर्मा याच्या घरी प्रभाकर आला होता. यावेळी दोघांमध्ये पैशाच्या वादातून वादावादी झाली. ही वादावादी इतकी वाढली की तिचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले. यावेळी विश्वकर्मा याने घरातील लोखंडी हातोड्याने प्रभाकरच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका जोरदार होता की, प्रभाकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. अखेर जास्त रक्तत्राव झाल्याने प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला. यात आरोपी विश्वकर्मा हा देखील जखमी झाला असून त्याला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इलेक्ट्रेशनचा ठेका घेण्याचा दोघांचा संयुक्त व्यवसाय होता. याच व्यवसायातून पैशाच्या देवानघेवाणीमधून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हत्येची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. आता या प्रकरणी प्रभाकर यांची बहीण आणि विश्वकर्मा याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून विश्वकर्मावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बदलापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. जीवघेणा ठरला नात्यातला व्यवहार, दिल्ली एकाच कुटुंबातील 5 जणांच्या मृतदेह प्रकरणाला धक्कादायक वळण दरम्यान, नात्यातील व्यवहारामुळे  देशाची राजधानी नवी दिल्लीतील भजनपूर परिसरात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत जयस्वाल कुटुंबाच्या नातेवाईकानेच हत्या केल्याचं कबूल केलं आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी प्रभू चौधरी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. प्रभू चौधरी हा जयस्वाल कुटुंबाचा नातेवाईक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू मिश्राने जयस्वाल कुटुंबातील 5 ही सदस्यांची हत्या केल्याचं कबूल केलं आहे. 30 हजार रुपयांच्या व्यवहारावरून वाद झाल्यामुळे 5 जणांची हत्या करण्यात आली. प्रभु चौधरी आणि मृत शंभू जयस्वाल यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. त्याने शंभूला 30 हजार रुपये उधार दिले होते.  पैसे परत देण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. प्रभू चौधरीने पोलिसांना हत्या कशी केली याबद्दल खुलासा केला. प्रभू चौधरी हा त्याचा नातेवाईक आहे. 3 फेब्रुवारीला शंभू जयस्वालला लक्ष्मीनगरला बोलावलं होतं. पण तो तिथे पोहोचण्याआधीच प्रभू त्याच्या घरी पोहोचला. शंभूच्या घरी पोहोचल्यानंतर प्रभूने आधी त्याच्या पत्नीची हत्या केली. आधी त्याने गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यानंतर त्याने छोटी मुलगी कोमलला बोलावलं आणि रॉडने वार करून तिचीही हत्या केली. त्यानंतर शिवमचीही तशीच हत्या केली. त्यानंतर तो लक्ष्मीनगरला परत आला. मारण्याआधी शंभूला पाजली दारू लक्ष्मीनगरला पोहोचल्यानंतर त्याने मृत शंभूसोबत दारू प्यायली. त्यानंतर रात्री 11 वाजता शंभूला त्याच्या घरी सोडलं. त्याच्या घरी पोहोचल्यावर प्रभूने शंभूची हत्या केली. अत्यंत थंड डोक्याने प्रभूने या पाचही जणांची हत्या केली. दुपारी जेव्हा तो शंभूच्या घरी पोहोचला होता, तेव्हा शंभूच्या पत्नीसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्याने चारही जणांची हत्या केली. प्रभू चौधरी हा मृत शंभूच्या आत्याचा मुलगा आहे. नात्याने दोघेही आते भाऊ लागतात. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने दुपारी 3 वाजता घरात पोहोचून 4 तासांमध्ये चौघांची हत्या केली. कुजलेल्या परिस्थितीत आढळून आले मृतदेह बुधवारी उत्तर-पूर्व दिल्लीतील भजनपुरा परिसरातील एकाच कुटुंबातील 5 जणांचे कुजलेल्या परिस्थितीत आढळून आले होते.  शंभु कुमार, सुनीता देवी, शिवम, सचिन आणि कोमल अशी या मृतांची नाव आहे. मृतदेह कुजल्यामुळे दुर्गेंधी पसरली होती, त्यानंतर हा भयावह प्रकार समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नी आणि 3 मुलांचे हे मृतदेह आहे. मृतांमध्ये मुलांचं वय हे अनुक्रमे 18,16 आणि 12 वर्षांच्या जवळपास आहे. मृतांची नातेवाईक सोनी जयस्वाल यांनी  News18 शी बोलताना सांगितलं की, जयस्वाल कुटुंब हे या परिसरात B ब्लॉकमध्ये राहत होतं. जवळपास 8 महिन्यापूर्वीच शंभू जयस्वाल यांनी एक ई-रिक्षा खरेदी केली होती. त्यांचा 18 वर्षांचा मुलगा शिवम हा बारावीला होता. तर दुसरा मुलगा सचिन (वय 15) आणि मुलगी मुस्कान (वय 13)  आणि पत्नी सुनीता देवी असा परिवार होता. हे सर्वजण बिहार येथील सोपोर जिल्ह्यात राहणारे होते. जयस्वाल कुटुंबाने काही दिवसांपूर्वीच हे घर भाड्याने घेतले होते. अचानक घरातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला आणि त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. अखेर दोन दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या